मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 4] क्रियापद ) सराव प्रश्न March 2, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती - 4] क्रियापद ) सराव प्रश्न 1 / 251) संयुक्त क्रियापदाच्या बाबतीत खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचा पर्याय निवडा.अ) संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोन क्रियावाचक शब्दांतून एकच क्रिया व्यक्त होणे गरजे असते.ब) संयुक्त क्रियापदांतील पहिला शब्द धातुसाधित तर दुसरा सहायक क्रियापद असतो.क) दोन्ही क्रियावाचक शब्दातून वेगवेगळ्या क्रिया व्यक्त झाल्या तरी ते संयुक्त क्रियापद असते.ड) एकट्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात A) अ,ब B) ब, क C) क, ड D) ड, क, अ 2 / 252) अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. A) राजेश रडत होता B) राजेश रडला होता C) राजेश रडत असे D) राजेश रडला 3 / 253) गुरुजी आता शाळेत असतील. A) प्रथम ताख्यात B) लाख्यात C) ई-लाख्यात D) ई-आख्यात 4 / 254) मला एवढा डोंगर चढवतो. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. A) शक्य क्रियापद B) प्रयोजक क्रियापद C) संयुक्त क्रियापद D) साधित क्रियापद 5 / 255) हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत. A) संख्यावाचक B) क्रमवाचक C) सार्वनामिक D) गणनावाचक 6 / 256) भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली, वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा. A) साताऱ्याच्या, डोंगरात, घेतली B) भाऊरावांनी, जमीन, घेतली. C) सातारा, विकते, माळरान D) जमीन, भाऊराव, डोंगर 7 / 257) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा 'तू त्या राजपुत्राला वर. A) त्या B) राजपुत्राला C) वर D) तू 8 / 258) 'खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई- राई एवढ्या' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. A) विध्यर्थ B) स्वार्थ C) संकेतार्थ D) आज्ञार्थ 9 / 259) धातूला प्रत्यय जोडून तयार केलेला शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवीत असेल तेव्हा अशा शब्दास काय म्हणतात? व अपूर्ण क्रियादर्शवीत असेल तेव्हा काय म्हणतात? योग्य पर्याय निवडा. A) अव्यय, धातू B) धातुसाधित, क्रियापद C) क्रियापद, धातुसाधित्त D) साधित शब्द व सिद्ध शब्द 10 / 2510) 'मुले क्रिकेट खेळू लागली.' या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. A) संयुक्त क्रियापद B) धातुसाधित क्रियापद C) उभयविध क्रियापद D) शक्य क्रियापद 11 / 2511) एवढा लाडू खाऊन टाक. अधोरेखित शब्द अनुक्रमे आहेत. A) विशेषण, नाम, धातुसाधित, सहायक क्रियापद B) कर्ता, नाम, मुख्य क्रियापद, सहायक क्रियापद C) नाम, विशेषण, धातुसाधित, मुख्य क्रियापद D) सर्वनाम, नाम, धातुसाधित, क्रियापद 12 / 2512) 'त्याच्या डोळ्यात पाणी आले' (नाम) क्रियापद करून वाक्य लिहा. A) त्याच्या डोळ्यात पाणी येते. B) त्याच्या डोळ्यातून अधूनमधून पाणी येते. C) त्याचे डोळे पाणावले D) यापैकी नाही 13 / 2513) दिलेल्या वाक्याचा आख्यातविकार ओळखा. तो बहुधा शाळेत असावा. A) लाख्यात B) ई-लाख्यात C) द्वितीय ताख्यात D) वाख्यात 14 / 2514) खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा. A) माणूस B) माणुसकी C) माणसाळणे D) माणूसपण 15 / 2515) निमंत्रण आले तर मी येईन. A) प्रथम ताख्यात B) द्वितीय- ताख्यात C) ई-आख्यात D) वाख्यात 16 / 2516) 'हे काम माझ्याकडून करविता येणार नाही.' या वाक्यातील 'करविता' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? A) सहाय्यक क्रियापद B) प्रयोजक क्रियापद C) प्रयोजक क्रियापद D) साधित क्रियापद 17 / 2517) मी हे काम करू? A) ऊ-आख्यात B) ई-लाख्यात C) लाख्यात D) ई-आख्यात 18 / 2518) 'वैभव पुस्तक वाचत आहे.या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. A) अकर्तृक क्रियापद B) सकर्मक क्रियापद C) क्रियापद D) अकर्मक क्रियापद 19 / 2519) बाह्य घटकाकडून प्रेरित झालेली क्रिया प्रयोजक असते, यातील प्रेरकच वाक्याचा कर्ता असतो. A) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक B) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर C) दोन्ही विधाने चूक D) दोन्ही विधाने बरोबर 20 / 2520) 'शामा चित्र काढत राहील' या वाक्याचा काळ ओळखा. A) साधा भविष्यकाळ B) रीति भविष्यकाळ C) पूर्ण भविष्यकाळ D) साधा वर्तमानकाळ 21 / 2521) खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. A) पळवते B) बसतो C) पाहतो D) नाही 22 / 2522) क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात .............. म्हणतात. A) धातुसाधित B) धातू C) कृदन्त D) गौण क्रियापद 23 / 2523) चुकीचा पर्याय निवडा. A) ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. B) बसा, उठा, ठेव ही क्रियापदे आज्ञार्थ सुचवितात. C) कर्तव्य दर्शविणारे वाक्य विध्यर्थी असते. D) जर निमंत्रण आले तर मी येईल. यातून नकारार्थ सूचित होतो 24 / 2524) सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल. A) चालू वर्तमानकाळ B) पूर्ण वर्तमानकाळ C) साधा वर्तमानकाळ D) रीती वर्तमानकाळ 25 / 2525) कृदंत/धातुसाधितांचे वेगवेगळे उपयोग होतात; परंतु खालील वाक्यात एक अपवाद आहे तो शोधा.१) तो बोलका पोपट आहे.२) तो धावताना धपकन पडला.३) ती सुंदर मुलगी आहे.४) बोलणाऱ्याचे हुलगे विकतात A) पर्याय 1 B) पर्याय 2 C) पर्याय 3 D) पर्याय 4 Your score isThe average score is 52% 0% Restart quiz
Kiran Damu Rathod
Wonderful
Nice
Very nice