मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती-नाम-सामान्यरुप) सराव प्रश्न February 25, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती - नाम - ड] सामान्य रूप ) सराव प्रश्न 1 / 251) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा. सशाला चार पाय असतात. A. ससा B. सशा C. सशाला D. ससाला 2 / 252) खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. 'जुईच्या वेलीला सुंदर फुल आले आहे.' A. सुंदर B. वेलीला C. जुईच्या D. फूल 3 / 253) खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होताना दंततालव्याच्या तालव्य होईल? A. चोच B. ससा C. जावई D. चंद्र 4 / 254) 'अ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'आ' कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. A. कोयता B. आजोबा C. खांब D. विंचू 5 / 255) नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला _______ असे म्हणतात. A. सामान्यनाम B. सामान्यरूप C. विभक्ती D. कारकार्थ 6 / 256) लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. A. लाडूला B. लाडूचा C. लाडवा D. लाडुवाला 7 / 257) कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा. माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे. A. अंगणाला B. अंगणाशी C. अंगणाचे D. अंगणा 8 / 258) 'झाड' या शब्दाचे सामान्य रूप कोणते? A. झाड B. झाडे C. झाडा D. झाडू 9 / 259) 'कुंकू' या शब्दाचे सामान्य रूप खालील दिलेल्यापैकी कोणते ते सांगा. A. कुंकवा B. कुंकू C. कुंकूवा D. कुंकवी 10 / 2510) खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. A. झाड B. सिंह C. फोटो D. मुलगी 11 / 2511) अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग ________ संधी होते. A. पूर्वरूप B. पररूप C. नवरूप D. अनुरूप 12 / 2512) मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो _________ होतो. A. ऱ्हस्व होतो B. दीर्घ होतो C. दोन्ही प्रकारे लिहितो येतो D. यापैकी नाही 13 / 2513) ऊ - कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप आ - कारान्त होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? A. वधू - वधूचा B. नातू - नातवाचा C. कोकरू - कोकराने D. आसू - आसवाने 14 / 2514) खालील पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही. A. भली B. वेडी C. लोकरी D. खरी 15 / 2515) विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा. A. विहिरी B. विहीर C. विहीरी D. विहार 16 / 2516) 'कुत्रा' या नामाचे सामान्य रूप काय होईल? A. कुत्र्या B. कुत्री C. कुत्रे D. कुत्री 17 / 2517) ' तो गावाहून आला ' या वाक्यातील अंत्याक्षरयुक्त सामान्यरूप सांगा A. गावा B. तो C. गावाहून D. आला 18 / 2518) नपुंसकलिंगी ई - कारान्त नामांचे सामान्यरूप कसे होते? A. आ - कारान्त B. या - कारान्त C. वा - कारान्त D. ओ - कारान्त 19 / 2519) अ - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते? A. या - कारान्त B. आ - कारान्त C. वा - कारान्त D. ई - कारान्त 20 / 2520) ईकारान्त स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्यरूप कसे होते? A. आकारान्त किंवा उकारान्त B. याकारान्त किंवा ओकारान्त C. वाकारान्त D. यापैकी नाही 21 / 2521) 'पुस्तकांना' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते? A. पुस्तक B. पुस्तके C. पुस्तकां D. पुस्तका 22 / 2522) 'कडा' या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. A. कड्या B. कड्यावर C. कड्याला D. कड्यावरून 23 / 2523) 'सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते.' या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे? A. स्त्रीचे B. मोत्यांमुळे C. अधिकच D. खुलते 24 / 2524) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप _______ होते A. याकारान्त B. उकारान्त C. ईकारान्त D. ओकारान्त 25 / 2525) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्यरूप होते. A. बंधू B. मोती C. सासू D. कावळा Your score isThe average score is 51% 0% Restart quiz
Jalgaon
Police bharti test
Nice
Exam
The best question of our students
Nice
Hb
bnnbvbvcg