मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – नाम ) सराव प्रश्न February 21, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( शब्दांचा जाती - 'नाम' ) सराव प्रश्न 1 / 251) नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. A. विशेषनाम B. भाववाचक नाम C. सामान्यनाम D. समूहवाचक नाम 2 / 252) पुढील नामाच्या प्रकार ओळखा - वात्सल्य. A. सामान्यनाम B. भाववाचक नाम C. विशेषनाम D. सर्वनाम 3 / 253) खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे? A. देवराष्ट्र B. महाराष्ट्र C. धृतराष्ट्र D. परराष्ट्र 4 / 254) खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे? A. देवराष्ट्र B. महाराष्ट्र C. धृतराष्ट्र D. परराष्ट्र 5 / 255) अवनी, तरुणी, वारुणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत? A. भाववाचक नामे B. पदार्थवाचक नामे C. ईकारान्त स्त्रीलिंगी नामे D. ऊकारान्त स्त्रीलिंगी नामे 6 / 256) भाववाचक नाम ओळखा. A. उंची B. शरद C. पुस्तक D. झाडे 7 / 257) 'उदार' या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? A. य, ता B. ई, त्व C. ई, पणा D. य, ई 8 / 258) खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषण साधित नाम आहे? A. नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्ने. B. दुष्ट माणसांचा शेवट नेहमी वाईटच होतो. C. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे D. भित्र्या माणसापाठी ब्रम्हराक्षस. 9 / 259) एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीच्या परिणाम होत असेल. तर त्याला _______म्हणतात. A. उपकार होणे B. विकार होणे C. अपकार होणे D. बदल होणे 10 / 2510) विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम _______ होय. A. विशेषनाम B. भाववाचक नाम C. सामान्यनाम D. समूहवाचक नाम 11 / 2511) साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? A. सामान्यनाम B. भाववाचक नाम C. समूहवाचक नाम D. पदार्थवाचक नाम 12 / 2512) समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला ________ असे म्हणतात. A. सामान्यनाम B. विशेषनाम C. भाववाचक नाम D. समूहवाचक नाम 13 / 2513) मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? A. दोन B. तीन C. चार D. पाच 14 / 2514) नामाच्या प्रकारातील _______ या नामाचे अनेकवचन होते. A. सामान्यनाम B. विशेषनाम C. भाववाचक नाम D. धातूसाधित नाम 15 / 2515) धातूसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? A. पळणे B. रडू C. हसू D. सत्य 16 / 2516) कोणतेही विशेषनाम _________असते. A. अनेकवचनी B. वचनहीन C. एकवचनी D. सामान्यनाम 17 / 2517) दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. अधोरेखित शब्द ओळखा. A. नाम B. सर्वनाम C. क्रियाविशेषण D. शब्दयोगी अव्यय 18 / 2518) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको भीम हवेत अधोरेखित शब्दांच्या प्रकार सांगा. A. विशेषनाम B. भाववाचक नाम C. सामान्यनाम D. समूहवाचक नाम 19 / 2519) खालील शब्दांतील सामान्य नाम कोणते? A. डोंगर B. हिमालय C. सह्याद्री D. अरवली 20 / 2520) विशेषनामे व सामान्यनामे ही भाव किंवा धर्म धारण करतात.म्हणून त्यांना_________ म्हणतात. A. धर्मवाचक नामे B. धर्मीवाचक नामे C. जातीवाचक नामे D. पदार्थवाचक नामे 21 / 2521) सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे _________होय. A. नाम B. सर्वनाम C. विशेषन D. क्रियापद 22 / 2522) भाववाचक नामांना _______ असेसुद्धा म्हणतात. A. धर्मवाचक नाम B. धर्मीवाचक नाम C. क्रियापदवाचक नाम D. जातीवाचक नाम 23 / 2523) विशेषनाम हे ________ असतात. A. जातीवाचक B. व्यक्तीवाचक C. विशेषण वाचक D. क्रियापद वाचक 24 / 2524) नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते? A. सर्वनाम, विशेषण व क्रियापद B. सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचक नाम C. सर्वनाम, भाववाचक नाम व सामान्यनाम D. सर्वनाम, भाववाचक नाम व विशेषनाम 25 / 2525) मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे? A. सामान्यनाम B. भाववाचक नाम C. समूहवाचक नाम D. पदार्थवाचक नाम Your score isThe average score is 64% 0% Restart quiz
🟦 मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नाम ) सराव प्रश्न🟦 एकूण प्रश्न : 25🟦 टेस्ट लिंक : https://bhartiwalabhau.com/मराठी-व्याकरण-शब्दांच्य/ Reply
Bhari hoti sir
Khup chan question hote..
🟦 मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नाम ) सराव प्रश्न
🟦 एकूण प्रश्न : 25
🟦 टेस्ट लिंक : https://bhartiwalabhau.com/मराठी-व्याकरण-शब्दांच्य/
Yes
Ty sir test saathi