अकोला पोलीस शिपाई February 25, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) अकोला जिल्हा पोलीस शिपाई 1 / 1001) अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशीम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ? A) 1 जुलै 1999 B) 1 जुलै 1997 C) 1 जुलै 1998 D) 1 जुलै 2000 2 / 1002) शहानूर हे कोणत्या व्याघ प्रकल्पाचा भाग आहे? A) मेळघाट B) ताडोबा C) सह्याद्री D) इंद्रावती 3 / 1003) खालीलपैकी चुकीची जोडी जुळवा A) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ-परभणी B) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ - अकोला C) बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-रायगड D) महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी 4 / 1004) भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदनुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे ? A) 324 B) 326 C) 360 D) 14 5 / 1005) खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही ? A) केरळ B) महाराष्ट्र C) बिहार D) उत्तर प्रदेश 6 / 1006) हिनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत ? A) हिंदू B) जैन C) बौद्ध D) शीख 7 / 1007) भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली ? A) भगतसिंग B) चंद्रशेखर आझाद C) श्यामजी कृष्ण वर्मा D) विनायक दामोदर सावरकर 8 / 1008) भारताची उत्तर दक्षिण लांबी किती कि.मी. आहे ? A) 15700 B) 2900 C) 7517 D) 3214 9 / 1009) भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा आहेत ? A) 8 B) 7 C) 6 D) 5 10 / 10010) खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ? A) पेरियार B) कावेरी C) कृष्णा D) घग्गर 11 / 10011) DFK, FEL, HDM, JCN, ? A) KBN B) KBO C) LBO D) LBN 12 / 10012) A) 29 B) 85 C) 118 D) 110 13 / 10013) A) 36 B) 9 C) 8 D) 25 14 / 10014) 13 : 19 : : 21 : ? A) 41 B) 81 C) 141 D) 14 15 / 10015) A729, G343, ?, S27, Y1 A) Q100 B) N75 C) L64 D) M125 16 / 10016) विधान 1 : एका दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण धावा 200 होत्या. विधान 2 : यापैकी 160 धावा फिरकीपटूंनी केल्या. निष्कर्षः1. संघात 80 टक्के फिरकीपटू आहेत2. सलामीचे फलंदाज फिरकीपटू होते A) फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे B) फक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे C) निष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर आहे D) निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्ही नाही 17 / 10017) विधानः काही खेळाडू भारतीय आहेत सर्व भारतीय चांगले आहेतनिष्कर्ष : 1. काही चांगले भारतीय आहेत2. काही चांगले खेळाडू आहेत A) फक्त निष्कर्ष 1 खालीलप्रमाणे आहे B) फक्त निष्कर्ष 2 खालीलप्रमाणे आहे C) एकतर निष्कर्ष 1 किंवा 2 खालीलप्रमाणे आहे D) निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्ही नाही. 18 / 10018) M आणि O च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. N चे वय किती आहे?विधान 1 : N हे पेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेविधान 2: O हे 30 वर्षांचे आहे A) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त विधान 1 पुरेसे आहे B) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त विधान 2 पुरेसे आहे C) विधान 1 आणि 2 दोन्ही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे आहेत D) विधान 1 आणि 2 दोन्ही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे नाहीत 19 / 10019) 6 व्यक्तीी एका वर्तुळात बसल्या आहेत. A से B कडे तोंड आहे, B, E च्या उजवीकडे आहे आणि C च्या डावीकडे आहे, C, D च्या डावीकडे आहे, F, A च्या उजवीकडे आहे. आता, D त्याची जागा F बरोबर आणि E त्याची जागा B बरोबर बदलतो, तर C च्या समोर बसला असेल ? A) C B) D C) B D) A 20 / 10020) बाजूला दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. A) 14 B) 16 C) 21 D) 19 21 / 10021) भारत सरकारच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट (Standard Deduction) मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे ? A) 80,000 B) 75,000 C) 85,000 D) 90,000 22 / 10022) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही ? A) कार्बन डायऑक्साईड B) नायट्रस ऑक्साइड C) हायड्रोजन D) मिथेन 23 / 10023) कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही ? A) भौतिकशास्त्र B) गणित C) शांतता D) साहित्य 24 / 10024) ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते ? A) पौड B) डेसिमल C) हर्टझ D) डेसिबल 25 / 10025) महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते ? A) सहायक आयुक्त B) उपायुक्त C) अतिरिक्त आयुक्त D) सहआयुक्त 26 / 10026) भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते ? A) के. एफ. रुस्तुमजी B) जे.डब्लू. रॉड्रिग्स C) एस. एस. हरनाम सिंग D) व्ही.आर. खेर 27 / 10027) प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? A) ISRO B) DRDO C) BRO D) BHEL 28 / 10028) कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून 'अंबुबाची मेळा' साजरा केला जातो ? A) पश्चिम बंगाल B) मणिपूर C) आसाम D) पंजाब 29 / 10029) मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? A) केरळ B) तामिळनाडू C) आंध्र प्रदेश D) कर्नाटक 30 / 10030) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे ? A) पुणे B) नागपूर C) दिल्ली D) मुंबई 31 / 10031) एलोन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही ? A) टेस्ला B) स्टार लिंक C) न्युरा लिंक D) ब्लॅक रॉक 32 / 10032) नोव्हाक जोकोविचने एकूण किती ग्रँडस्लॅम जिंकले आहेत ? A) 24 B) 22 C) 23 D) 29 33 / 10033) खालीलपैकी कोणते अर्ध सैन्य बल नाही? A) ASSAM RIFLES B) BSF C) CISF D) CRPF 34 / 10034) 'हुमायूं नामा' कोणी लिहिला आहे? A) हुमायून B) बाबर C) गुलबदन बेगम D) अबुल फजल 35 / 10035) करणचा जन्म शनिवार 22 मार्च 1982 रोजी झाला. ज्या दिवशी तो 14 वर्षे 7 महिने 8 दिवसांचा झाला, त्यादिवशी कोणता वार होता? A) रविवार B) मंगळवार C) बुधवार D) शनिवार 36 / 10036) स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते ? A) मल्लखांब B) कुस्ती C) भारत्तोलन D) मुष्टीयुद्ध 37 / 10037) अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तो 08.40 वाजता स्टॉपवर पोहोचला. तर बस स्टॉपसाठी तो. सहसा किती वाजता घरून निघतो ? A) 08.30 वाजता B) 08.45 वाजता C) 08.55 वाजता D) माहिती अपूर्ण 38 / 10038) दिलेल्या श्रृंखलेमध्ये कोणता अंक चुकीचा आहे : 9, 11, 15, 23, 39, 70, 135 A) 23 B) 39 C) 70 D) 135 39 / 10039) -11, 121, 13, 169, -15, ? A) 99 B) 125 C) 225 D) 180 40 / 10040) 1,1,0,2,8,6,3,27,24,4,64, ? A) 60 B) 72 C) 96 D) 16 41 / 10041) गवताची गंजी :: तारकांचा: ? A) वृंद B) थवा C) पुंज D) उत्तरंड 42 / 10042) कुत्रे : भुंकणे : साप : ? A) चितकारणे B) गुंजारव C) ची ची D) फुत्कारणे 43 / 10043) नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.. A) गर्विष्ट B) उद्धट C) विनम्र D) विनय 44 / 10044) क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) खारट B) गंधक C) पाणी D) दूध 45 / 10045) गटात न बसणारे शब्द ओळखा. A) रमा B) इंदिरा C) निशा D) कमला 46 / 10046) खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ? A) ? B) ! C) : D) ; 47 / 10047) 'तोफेच्या तोंडी देणे' या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय शोधा. A) तोंड काळे करणे B) संकटात लोटणे C) त्रास देणे D) तोंड फिरविणे 48 / 10048) खालीलपैकी षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते ? A) स, ला, ते B) ऊन, हून C) चा, ची, चे D) ने, ए, शी 49 / 10049) 'जळू' या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. A) जळे B) जळा C) जळवा D) जळ्या 50 / 10050) एखाद्या शब्दावरती लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला....... म्हणतात. A) उपकार होणे B) अपकार होणे C) विकार होणे D) बदल होणे 51 / 10051) 2, 8, 18, 32, ? A) 62 B) 60 C) 50 D) 46 52 / 10052) 2, 3, 6, 18, ?, 1944 A) 154 B) 180 C) 108 D) 452 53 / 10053) 1, 2, 9,4,25,6, ? A) 51 B) 49 C) 50 D) 47 54 / 10054) 16, 33, 67, 135, ? A) 371 B) 175 C) 271 D) 287 55 / 10055) 8, 24, 16, ?, 7, 14, 6, 18, 12 A) 10 B) 14 C) 7 D) 5 56 / 10056) π वे साधारण मूल्य किती आहे ? A) 3.416 B) 3.1416 C) 3.1417 D) 3.417 57 / 10057) x² - 5x + 6 =0 तर x चे मूल्य सांगा. A) 1 B) 2 C) 4 D) 6 58 / 10058) एका वस्तुची खरेदी किंमत 500 रु. आहे विक्री किंमत 600 रु. असल्यास नफा टक्केवारी किती आहे ? A) 10 B) 15 C) 20 D) 25 59 / 10059) दोन संख्यांचा गुणाकार 45 आहे आणि त्यांची बेरीज 14 आहे त्या संख्या कोणत्या ? A) 6,8 B) 5,9 C) 10,4 D) 7,7 60 / 10060) 5x - 3 = 2x + 9 तर x चे मूल्य काय ? A) 2 B) 3 C) 4 D) 5 61 / 10061) 1000 लोकांच्या समूहामध्ये 700 लोक इंग्लिश बोलू शकतात आणि 500 हिंदी बोलू शकतात. जर सगळे लोक कमीतकमी 2 पैकी 1 भाषा बोलू शकतात तर किती लोक दोन्ही भाषा बोलू शकतात ? A) 100 B) 200 C) 300 D) 400 62 / 10062) वर दिलेल्या प्रश्नाप्रमाणे किती लोक फक्त एकच भाषा बोलू शकतात ? A) 200 B) 300 C) 700 D) 800 63 / 10063) जर एका सांकेतिक भाषेमध्ये IMPORT हे USPQNJ असे लिहिले जाते तर CAPITAL हे कसे लिहिले जाईल ? A) MBUJQBD B) KZSHOZB C) MUBJBDQ D) MBQJUBD 64 / 10064) जर हवेला पाणी, पाण्याला हिरवा, हिरव्याला धूळ, धुळीला पिवळे आणि पिवळ्याला ढग म्हटले तर खालीलपैकी मासे कोणत्या ठिकाणी राहतात ? A) हवा B) पाणी C) हिरवा D) पूल 65 / 10065) जर एका सांकेतिक भाषेमध्ये BOX हे CDPQYZ असे लिहिले जाते तर त्या सांकेतिक भाषेमध्ये HERO शब्दासाठी शेवटचे दोन अक्षरे कुठले असतील ? A) N,M B) M,N C) P,Q D) Q,P 66 / 10066) एका विशिष्ट सांकेतिक भाषेत PAT ZOO SIM म्हणजे EAT GOOD MANGOES. PUS SIM TIM म्हणजे MANGOES AND SWEETS आणि TIM ZOO KIT म्हणजे PURCHASE GOOD SWEETS, तर त्या भाषेतील कोणत्या शब्दाचा अर्थ GOOD आहे ? A) ZOO B) PUS C) SIM D) TIM 67 / 10067) एका संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी अमित आणि सुमित हे दोन मित्र एकमेकांशी समोरासमोर बोलत होते जर सुनीलची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती तर अमितचा चेहरा कोणत्या दिशेला होता? A) उत्तर B) दक्षिण C) पश्चिम D) माहिती अपूर्ण 68 / 10068) दोन बसेस 150 किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या विरुद्ध बिंदूपासून सुरू होतात. पहिली बस 25 किलोमीटर धावते, त्यानंतर उजवीकडे वळण घेते आणि 15 किलोमीटर धावते. त्यानंतर डावीकडे वळते आणि आणखी 25 किलोमीटर चालून ते मुख्य रस्त्यावर परत लागते. दरम्यान, एका किरकोळ बिघाडामुळे दुसरी बस मुख्य रस्त्याने केवळ 35 किलोमीटर धावली. या ठिकाणी दोन बसमधील अंतर किती असेल ? A) 75 कि.मी. B) 80 कि.मी. C) 65 कि.मी D) 85 कि.मी. 69 / 10069) अभियंता: मशीन :: ? A) डॉक्टर आजार B) डॉक्टर औषध C) डॉक्टर हॉस्पिटल D) डॉक्टर शरीर 70 / 10070) पाणीः ऑक्सिजन :: ? A) हेलियम : नायट्रोजन B) मीठ: सोडियम C) झाड : वनस्पती D) अन्न : भूक 71 / 10071) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 452.39 चौ. सें.मी. तर त्याची त्रिज्या किती ? A) 11 सें.मी B) 18 सें.मी. C) 12 सें.मी D) 15 सें.मी. 72 / 10072) एका आयताची लांबी 19 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ? A) 219 चौ.मी B) 209 चौ.मी C) 229 चौ.मी. D) 239 चौ.मी. 73 / 10073) समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप किती असते ? A) 30° B) 45° C) 60° D) 75° 74 / 10074) एक घराचे बांधकाम 18 पुरुषांनी 20 दिवस दररोज 12 तास काम केल्यानंतर घर पूर्ण झाले. तर 15 पुरुषांनी दररोज 9 तास काम केल्यास ते घर बांधण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील ? A) 30 B) 32 C) 36 D) 40 75 / 10075) एक कंपनी एक वस्तू 50 रुपयांना बनवली. ती एका व्यापाऱ्याला 60 रुपयांना विकली. व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला 75 रुपयांना विकली. नंतर दुकानदाराने तिच वस्तू एका ग्राहकाला 100 रुपयांना विकली. तर कंपनीच्या नफ्याची टक्केवारी शोधा. A) 16.6 टक्के B) 25 टक्के C) 20 टक्के D) 33.3 टक्के 76 / 10076) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना आपण काय म्हणतो ? A) अक्षर B) वर्ण C) व्यंजन D) स्वर 77 / 10077) गटात न बसणारा वर्ण ओळखा. A) क् B) ख् C) ग् D) फ् 78 / 10078) 'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा. A) उल् + लंघन B) उस् + लंघन C) उल्ल + अंघन D) उत् + लंघन 79 / 10079) खारट शब्दाची जात ओळखा. A) सर्वनाम B) दर्शक सर्वनाम C) विशेषण D) नाम 80 / 10080) खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. A) झरा B) लाटा C) चांदण्या D) खाटा 81 / 10081) मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे? A) सामान्यनाम B) भाववाचक नाम C) समुदायवाचक नाम D) विशेषनाम 82 / 10082) विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? A) विधाती B) विधाते C) विद्यादेवता D) यापैकी नाही 83 / 10083) 'हिरवे हिरवेगार गालीचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ? A) आवृत्तीवाचक विशेषण B) गणनावाचक विशेषण C) गुणवाचक विशेषण D) क्रमवाचक विशेषण 84 / 10084) वाक्यात सर्वनामाचा वापर अशावेळी केला जातो.1. नामाचे द्विरूप्ती टाळण्यासाठी2. नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी A) फक्त 1 बरोबर B) फक्त 2 बरोबर C) 1 व 2 बरोबर D) दोन्ही बरोबर नाही. 85 / 10085) मरावे परी कीर्तीरूपी उरावे अधोरेखित शब्द हा कोणता उभयान्वयी अव्यय आहे? A) विकल्पबोधक B) परिणामबोधक C) समुच्चयबोधक D) न्यूनत्वबोधक 86 / 10086) 'मला हा डोंगर चढवतो' या वांक्यातील प्रयोग ओळखा. A) समापन कर्मणी B) शक्य कर्मणी C) नवीन कर्मणी D) भावे 87 / 10087) भाजीभाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? A) इतरेतर द्वंद्व B) वैकल्पिक द्वंद्व C) नत्र बहुव्रीही द्वंद्व D) समाहार द्वंद्व 88 / 10088) खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा. A) जे जे B) समोरा समोर C) डाव पेच D) तुकडे तुकडे 89 / 10089) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. A) सीहासन B) आनभीज्ञ C) स्वभावीक D) शिपाई 90 / 10090) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. A) प्रवीण्य B) चमत्कार C) चिरंजीव D) निर्भय 91 / 10091) x²-4x + 4 = 0 तर x चे मूल्य काय ? A) 4 B) 2 C) 3 D) 9 92 / 10092) एक दुकानदार एक वस्तू 20 टक्के नफ्यावर 60 रुपयाला विकतो. 30 टक्के नफा मिळवण्यासाठी त्याने ते किती रुपयाला विकावे ? A) 63 B) 65 C) 68 D) 70 93 / 10093) एखादी वस्तू 6 टक्के नफ्याने विकल्यास 36 रुपये मिळतात. तर वस्तूची किंमत किती आहे ? A) 500 B) 550 C) 600 D) 650 94 / 10094) सात संख्यांची सरासरी 40 आहे. त्यापैकी एकूण चार संख्यांची बेरीज 178 आहेत. उर्वरित तीन संख्या 1:2:3 च्या प्रमाणात आहेत. तर ते तीन अंक कोणते ? A) 15,30,45 B) 16,32,48 C) 17,34,51 D) 18,36,54 95 / 10095) 550 विद्यार्थ्यांच्या शाळेत, मुले आणि मुलींचे गुणोत्तर 6:5 आहे. तर गुणोत्तर समान करण्यासाठी आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा 216 लागेल ? A) 40 B) 50 C) 60 D) 150 96 / 10096) एखाद्या माणसाला एका विशिष्ट ठिकाणी चालत जाण्यासाठी आणि सायकलवरून परत येण्यासाठी 10 तास लागतात. तर जाण्या व येण्यासाठी सायकलचा वापर केला तर त्याला 2 तास कमी लागतात. तर त्याला चालत जाण्या-येण्यासाठी किती वेळ लागेल ? A) 14 B) 8 C) 6 D) 12 97 / 10097) शाळेतील प्रत्येक विभागातील विद्यार्थी संख्या 22 होती. नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले. आता, विभागांची एकूण संख्या 16 आहे आणि प्रत्येक विभागात 21 विद्यार्थी आहेत. तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ? A) 24 B) 28 C) 40 D) 44 98 / 10098) एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमावतो आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा 20 रुपये कमावतो आणि चौथ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. जर तो असाच कमावत राहिला आणि खर्च करत राहिला तर त्याच्याकडे 50 रुपये कितव्या दिवशी जमा होतील ? A) 10 वा दिवस B) 13 वा दिवस C) 15 वा दिवस D) 20 वा दिवस 99 / 10099) एक टाकी 2/5 भरली आहे. जर टाकीमध्ये 16 लिटर पाणी टाकले तर ती टाकी 6/7 भरली आहे. तर त्या टाकीची क्षमता किती आहे ? A) 30 B) 42 C) 40 D) 35 100 / 100100) एका सफरचंदाची किंमत प्रत्येकी 7 रुपये आहे. एका आंब्याची किंमत प्रत्येकी 5 रुपये आहे. एका व्यक्तीने सफरचंद आणि आंबा खरेदी करण्यासाठी 38 रुपये खर्च केले. जर त्याने 2 आंबे खरेदी केले तर तो जास्तीत जास्त किती सफरचंद खरेदी करू शकतो ? A) 2 B) 3 C) 4 D) 5 Your score isThe average score is 43% 0% Restart quiz
Gadchiroli police bhrti ka bhi paper link daliye
🙏🏻
Nice 👍