Maharashtra Police Bharti Prakriya 2025 Mahiti

Maharashtra Police Bharti Prakriya 2025: मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीची वाट लाखों उमेदवार पाहत आहेत. कारण पोलीस भरती राज्यातील हजारो तरुणांची स्वप्ने साकार करण्याची एक सुवर्णसंधी आहे. पण जर तुम्हाला पोलीस भरती मध्ये यश मिळवायचा असेल तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम व परीक्षेची पद्धत तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहे.
पुढे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धत, शारीरिक पात्रता, मैदानी चाचणीची माहिती, तसेच निवड प्रक्रियेबद्दल (Maharashtra Police Bharti Prakriya 2025) सर्व माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. जेणेकरून तुम्हाला कसली अडचण येणार नाही.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण माहिती
भरतीचे टप्पे (Selection Process) : पुढे तुम्हाला भरतीचे टप्पे दिले आहेत. यापुढील टप्प्यामध्येच महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती केली जाते.
- शारीरिक चाचणी (PET/PST) – 50 गुण
- लेखी परीक्षा – 100 गुण
पुढे आपण या दोन्ही टप्प्यांची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.
Police Bharti Physical Test Details
शारीरिक चाचणी : पोलीस भरती मधील सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी. ही पोलीस भरतीतील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये उमेदवारांची फिटनेस, सहनशक्ती आणि वेग तपासला जातो. खाली पुरुष व तृतीयपंथीय आणि महिलांच्या शारीरिक चाचणीची आणि त्यामधील मिळणाऱ्या गुणांची माहिती दिली आहे.
पुरुष व तृतीयपंथीय उमेदवारांसाठी:
Event | Marks |
---|---|
1600 मीटर धाव | 30 |
100 मीटर धाव | 10 |
गोळा फेक (Shot Put) | 10 |
एकूण गुण | 50 |
महिलांसाठी (Femail Police Bharti Ground Details) :
Event | Marks |
---|---|
800 मीटर धाव | 30 |
100 मीटर धाव | 10 |
गोळा फेक (Shot Put) | 10 |
एकूण गुण | 50 |
लक्षात ठेवा : या चाचणीमध्ये उमेदवारांना किमान 25 टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे.
Police Bharti Written Exam Pattern

लेखी परीक्षा : शारीरिक चाचणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची पुढे लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेचे स्वरूप व त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला पुढे दिली आहे. Maharashtra Police Bharti Prakriya 2025
लेखी परीक्षेमध्ये विषयानुसार प्रश्नांची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
- कालावधी: 90 मिनिटे
- किमान पात्रता गुण: 40 गुण (40%)
विषय | प्रश्नांची संख्या |
---|---|
गणित | 25 |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 25 |
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) | 25 |
मराठी व्याकरण | 25 |
एकूण | 100 |
Police Bharti Syllabus Pattern
पोलीस भरती मध्ये पुढील Subject असतात. त्याची माहिती पुढे सविस्तर दिली आहे. ते पहा.
1. गणित : गणित हा शंका व अचूकता यांवर आधारित विषय आहे. पोलीस भरती परीक्षेत गणिताचे प्रश्न सरळ आणि प्राथमिक स्वरूपाचे असतात, पण वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते.
महत्त्वाचे Topic:
- विभाज्यता नियम
- सरासरी
- वेळ व काम
- नफा-तोटा
- टक्केवारी
- अनुपात व प्रमाण
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- क्षेत्रफळ व घनफळ गणना (Geometry)
- वेळ, वेग व अंतर
- गणितीय सरळ सूत्रे
- संख्याश्रेणी, HCF/LCM
2. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी : ही विभाग तुमच्या संपूर्ण सामान्य ज्ञानावर आधारित असते. या विभागातून राजकारण, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थव्यवस्था यावर प्रश्न विचारले जातात.
मुख्य Topic:
- महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
- स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख टप्पे
- भारतीय राज्यघटना व तिचे घटक
- भौगोलिक रचना (नद्या, पर्वत, हवामान)
- भारतीय अर्थव्यवस्था
- विज्ञान व तंत्रज्ञान (विशेषतः चालू घटनांवर आधारित)
- क्रीडा, पुरस्कार, साहित्य, यशस्वी व्यक्तिमत्त्वे
- चालू घडामोडी (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय)
- सरकारी योजना व धोरणे
महत्वाचे : मित्रांनो General Knowledge असा Topic आहे. जो कितीही वाचला तरी कमीच असतो कारण या टॉपिकचा सिल्याबस एका पुस्तकांमध्ये कधीच मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला सतत वर्तमानपत्रे, चालू घडामोडी पाहत रहा. Maharashtra Police Bharti Prakriya 2025

Police Bharti Intelligence Test / Reasoning
ही विभाग उमेदवारांची विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, आणि तर्कशक्ती तपासण्यासाठी असते.
महत्त्वाचे टॉपिक्स:
- आकृती/प्रतिमान ओळखणे
- अंक व शब्द मालिका
- कोडिंग-डेकोडिंग
- रक्तसंबंध
- दिशा ज्ञान
- क्रम व व्यवस्थापन
- गणितीय तर्क
- पहिलं-शेवटं, बीचचं तत्व
- वक्तव्य व निष्कर्ष
3. मराठी व्याकरण : मराठी व्याकरण हा सर्व उमेदवारांसाठी scoring विभाग असतो. कारण यामध्ये बोलीभाषेच्या कौशल्यावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. Maharashtra Police Bharti Prakriya 2025
मुख्य घटक:
- वाक्यरचना
- क्रियापद व काळ
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- वाक्यप्रकार व त्यांचे प्रकार
- म्हणी व वाक्प्रचार
- अलंकार, छंद
- योग्य शब्दांची निवड
- शब्दांचे प्रकार
- नाम, सर्वनाम, विशेषण
- वाक्याचे विश्लेषण
Police Bharti Preparation in Marathi
- दररोजच्या अभ्यासाचे नियोजन करा: प्रत्येक विषयासाठी 1-2 तास द्या.
- Mock Tests सोडवा: वेळेचे व्यवस्थापन आणि आत्ममूल्यांकनासाठी अत्यंत उपयुक्त.
- पूर्वीच्या वर्षांचे प्रश्नपत्रिका अभ्यासा: प्रश्नांची पद्धत समजते.
- फिजिकल प्रॅक्टिस विसरू नका: धावणे व गोळा फेक याचा सराव ठराविक वेळेत पूर्ण करा.
- चालू घडामोडींचा डायरी ठेवा: दररोजच्या बातम्यांची नोंद ठेवा.
- मराठी बातम्यांचे YouTube चॅनेल्स बघा: Loksatta, ABP Majha, TV9 Marathi.
- आरोग्यावर भर द्या: शारीरिक चाचणीसाठी पोषणयुक्त आहार आणि पुरेशी झोप अत्यावश्यक आहे.
अशा पद्धतीने जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. Maharashtra Police Bharti Prakriya 2025 ही माहिती तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि अशीच माहिती दिली पाहण्यासाठी भरती वाला भाऊ या आपल्या वेबसाईटला भेट देत जा.
ही माहिती पहा :