डॉ.बाबासाहेब आंबेडकर :
- जन्म : १४ एप्रिल, १८९१, मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे.
- मूळ गाव आंबडवे (जि. रत्नागिरी)
- डॉ. बाबासाहेबांचे वडील लष्करात सुभेदार पदावर काम करत होते. त्या दरम्यान बाबासाहेबांचा जन्म महू येथे झाला.
- मूळ नाव : भीमराव रामजी सकपाळ ऊर्फ आंबावडेकर. • आईचे नाव : भीमाबाई
- डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या आई-वडिलांचे १४ वे व शेवटचे अपत्य होते.
- शिक्षण : प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली व त्यानंतर साताऱ्यातील अॅग्रीकल्चर स्कूल (एलिमेंटरी स्कूल/प्रतापसिंह स्कूल) मध्ये प्रवेश. या शाळेतील कृष्णाजी केशव आंबेडकर या प्रेमळ गुरुंनी बाबासाहेबांना आपले ‘आंबेडकर’ हे आडनाव स्वीकारण्यास सांगितले.
- १९०५ : रमाबाई यांच्याशी विवाह.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक सुधारणा :
- १४ जून १९२८ : डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
- १९४६ : मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
- या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज (१९४६) तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची (१९५०) स्थापना केली.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द : मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती (१९२६-१९३६)
- १९२८ च्या सायमन कमिशनला भारतभर विरोध होत असताना डॉ. बाबासाहेबांनी कमिशनसमोर अस्पृश्य बांधवांच्या समस्या मांडल्या.
- १९३३ : बाबासाहेबांनी विधीमंडळात ग्रामपंचायत बिलावर भाषण केले.
- १९३० ते १९३२ : लंडन येथील तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित होते.
- बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत दलित बांधवांना प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन कनफर्मिस्ट हिंदूंचा दर्जा मिळावा अशी मागणी केली.
- २४ सप्टेंबर १९३२ : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा कारागृहात ऐक्य करार.
- १९४२-१९४६ : या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजुरमंत्री म्हणून नियुक्ती.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांताच्या विधीमंडळातून घटना समितीवर निवडून आले.
- २९ ऑगस्ट १९४७ : संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड.
- १९४७ : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री.
- १९४८ : हिंदू कोड बिलाची निर्मिती. (हिंदू कोड बिल हे अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होते. या बिलानुसार स्रिया व समाजातील इतर घटकांना समान हक्क मिळणार होते.)
- १९५१ : हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा त्याग केला.
- १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाने लोकसभेच्या ३४ जागा लढविल्या. त्यापैकी २ सदस्य निवडून आले. तर याचवेळी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये २१५ जागा लढविल्या, त्यापैकी १२ सदस्य निवडून आले.
- १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब उत्तर-मध्य मुंबई या राखीव मतदारसंघातून पराभूत झाले होते. बाबासाहेबांचे एकेकाळचे सहकारी व काँग्रेस नेते नारायण सादोबा काजरोळकर यांनी त्यांना पराभूत केले.
- मार्च १९५२ मध्ये डॉ. बाबासाहेब राज्यसभेवर निवडून गेले.
- डॉ. बाबासाहेबांनी साऊथबरो समितीसमोर साक्ष मांडताना प्रांतिक कायदेमंडळात अस्पृश्य बांधवांना स्वतंत्र
- प्रतिनिधित्व देण्यासंबंधी शिफारस केली.
- कायदेमंडळात कामगार खात्याचे मंत्री असताना बाबासाहेबांनी १९४२ ते १९४६ या कालावधीसाठी ‘पुनर्बाधणी व पुनर्वसन योजना’ राबविली. पहिल्या पंचवार्षिक योजनेत या योजनेचा आधार घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय पक्ष :
स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) :
- १५ ऑगस्ट १९३६ रोजी या पक्षाची स्थापना. या पक्षाने १९३७ च्या प्रांतिक निवडणुका लढवून १३ जागा जिंकल्या. या निवडणुकीत पक्षाचे निवडणूक चिन्ह : ‘माणूस’.
- ‘मजूर वर्गाने संघटित होऊन कायद्याच्या आधारे सामाजिक सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे.’ या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
- अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन: १८ जुलै १९४२ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाचे रूपांतर ‘अ. भा. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षात झाले. (पक्ष मुख्यालय : नागपूर)
- ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेमागे आप्पादुराई यांची प्रेरणा होती.
- ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाचे रुपांतर पुढे ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षात झाले. (पक्षाचे चिन्ह: हत्ती)
- नागपूर येथे त्यांनी व्यापक तत्त्वज्ञानावर आधारित नव्या ‘रिपब्लिकन पार्टी’ या पक्षाची घोषणा केली होती, मात्र त्यांचे हे स्वप्न त्यांच्या निधनानंतर प्रत्यक्षात आले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था :
- बहिष्कृत हितकारिणी सभा २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे या सभेची स्थापना.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, तर सीताराम शिवतरकर हे सचिव होते.
- उद्देश : अस्पृश्य बांधवांना शिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे.
- बहिकृष्त हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य ‘शिका, चेतवा व संघटीत व्हा’.
- बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्य बांधवांसाठी वाचनालये, प्रौढ रात्रशाळा सुरू करण्यात आल्या.
- ४ जानेवारी १९२५ रोजी या सभेच्या वतीने सोलापूर येथे वसतीगृह स्थापन केले.
- समाज समता संघ : १९२७ साली या संघाची स्थापना.
- १९२८ : या संघातर्फे समता, जनता व प्रबुद्ध भारत ही पत्रे सुरू केली.
- १९५५ : बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ची स्थापना.
बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले महत्त्वाचे सत्याग्रह :
- २० मार्च १९२७ : बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह महाड (जि. रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रह केला.
- २५ डिसेंबर १९२७ : महाड येथील सत्याग्रह परिषदेत अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या ‘मनुस्मृती’ या धर्मग्रंथाचे
- दहन. या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते दिपू संभाजी गायकवाड.
- २ मार्च १९३० : नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह. याचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली हिंदू मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पृश्य बांधवांच्या सामाजिक
- गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठी केलेली चळवळ होती.
- मंदिर प्रवेश चळवळीमुळे १९३५ मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले झाले. त्यानंतर एलिचपूर येथील दत्तमंदिर, अमरावतीचे अंबेचे मंदीर, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर इ. मंदिरांच्या सत्याग्रहाच्या चळवळी पुढे आल्या.
- १९३३ : हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे सत्याग्रह.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य :
- १४ एप्रिल १९२९ : चिपळूण येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबांनी भूषविले.
- १० जानेवारी १९३८ : कोकणातील ‘खोती’ पद्धत नष्ट करण्याच्या मागणीसाठी बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळावर २५ हजार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढला. बाबासाहेबांनी ‘शेतीचे राष्ट्रीयीकरण’ ही संकल्पना मांडली.
- बाबासाहेबांनी पाण्याच्या नियोजनासाठी ‘दामोदर खोरे परियोजना’ ही संकल्पना मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर :
- १३ ऑक्टोबर १९३५ : येवला (जि. नाशिक) येथे प्रतिज्ञा ‘हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही.”
- १४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे डॉ. आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. (नागपूरला दीक्षाभूमी असे संबोधले जाते.) १४ ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.
- ब्रह्मदेशचे (म्यानमार) चंद्रमणी महास्थवीर यांनी आंबेडकरांना बौद्धधर्माची दीक्षा दिली.

Yes
Yes
Yes