An in-depth study of rivers and tributaries of India भारतातील नद्या व उपनद्या यांच्या सखोल अभ्यास व माहिती

भारत – नदीप्रणाली

Table of Contents


भारतीय नदी प्रणाली प्रामुख्याने दोन गटात विभागले जाते.
1) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या
2) भारतीय पठारावरील (द्विपकल्पयी) नद्या

1) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या –

  • सिंधू सतलज, गंगा, यमुना,ब्रम्हपुत्रा इ.
  • हिमालयीन नद्या बारमाही व युवावस्थेतील नद्या आहेत. यांच्या अपरक्षण कार्यामुळे ‘V’ आकाराची दरी, खोल घळई, धबधबे, द्रूतप्रवाह ही भूरूपे तयार होतात.
  • हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचचे –
  • अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि
  • ब) बंगालचा उपसागरास मिळणाऱ्या असे दोन प्रकार पडतात.
  • भूगर्भ संशोधकांच्या मते हिमालयीन नद्या हिमालयाहूनही जुन्या आहेत.

अ] अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या –

1) सिंधू नदी –

  • उगम : मानस सरोवरच्या उत्तरेस.
  • सिंधू नदी भारतात लडाखमध्ये प्रवेश करते. ही नदी चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशातून वाहते.
  • सिंधू नदी लडाख मधून वाहत जाऊन गिलगिट येथे पाकिस्तानात प्रवेश करते.
  • पाकिस्तानात कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रास मिळते.
  • एकूण लांबी : 2880 km
  • भारतातील लांबी : 800 km
  • सिंधूच्या भारतातील उपनद्या : झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास, श्योक, झास्कर, गिलगिट, सतलज.

2) सतलज नदी –

  • उगम : मानस सरोवराजवळील राकस सरोवरात
  • सतलज नदीचे मूळ नाव : शतद्रू, शताद्री
  • सतलज नदी शिप्कीला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते.
  • हिमाचल प्रदेश व पंजाब मधून वाहत पाकिस्तानात सिंधूला मिळते.
  • एकूण लांबी : 1450
  • भारतातील लांबी : 1050

ब] बंगालचा उपसागरास मिळणाऱ्या नद्या :-

1) गंगा नदी –

  • उगम : कुमाऊँ हिमालयातील गंगोत्री येथे हिमनदीपासून उगम.
  • भारतातील सर्वाधिक लांबीची नदी – 2525 km
  • अलकनंदा (उगम : अलकापुरी, उत्तराखंड) व भागीरथी (उगम : गंगोत्री) या दोन नद्या ‘देवप्रयाग’ येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहास ‘गंगा’ असे नामाभिधान आहे.
  • उत्तराखंड,उत्तर प्रदेश,बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यातून गंगा वाहते.
  • राजमहल टेकड्यांना वळसा घालून गंगा दक्षिणेकडे वाहते, तेव्हा फराक्का धरणाजवळ हुगळी ही गंगेची पहिली व सर्वात मोठी वितरिका तयार होते व ती प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये वाहते. (हुगळीची लांबी : 260 km)
  • भागीरथी व जालंगी नद्यांच्या प्रवाहातून हुगळी हा प्रवाह तयार होतो.
  • गंगा ही भारतातील पाच राज्यातून व बांगलादेशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे.
  • गंगा (पद्मा) व ब्रम्हपुत्रा संयुक्तपणे बांगलादेशातील चंदीपूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळतात.
  • गंगेच्या प्रमुख उपनद्या : डाव्या (उत्तरेकडील) : रामगंगा,गोमती,घागरा, गंडक,कोसी,महानंदा.
  • उजव्या (दक्षिणेकडील) : यमुना, शोन
  • सतत पात्र बदलत असल्याने कोसी नदीला ‘बिहारचे दुःखाश्रू’ म्हणतात.
  • गंगेचे खोरे हें देशातील सर्वात मोठे (प्रथम क्रमांकाचे खोरे आहे.
  • डिसेंबर 2008 मध्ये भारत सरकारने गंगा नदीस ‘राष्ट्रीय नदी’ म्हणून घोषित केले.

2) यमुना नदी –

  • उगम : यम्नोत्री, हिमालय
  • लांबी : 1376 km
  • ही गंगेची सर्वात मोठी उपनदी अलाहाबाद येथे गंगेला मिळते. सरस्वती ही गुप्त नदी गंगेला येथेच मिळते.
  • उपनद्या : चंबळ,सिंध, बेटवा, धसान, केन या नद्या माळवा पठारावर उगम पावतात व पुढे यमुनेला मिळतात.

3) ब्रम्हपुत्रा –

  • उगम : मानसरोवर (तीबेट)
  • लांबी : 2900 km
  • भारतातील लांबी : 885 km
  • ‘त्सांगपो’ या नावाने तिबेटमधून वाहणाऱ्या नदीस भारतात अरुणाचल प्रदेशात दिहांग म्हणतात.
  • दिहांग नदीस दिबांग व लोहित या नद्या मिळतात. त्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणून ओळखले जाते.
  • ब्रह्मपुत्रा नदी चीन,भारत व बांगलादेश या तीन देशातून वाहते.
  • ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागरास मिळते.
  • बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही ‘जमुना’ नावे प्रसिद्ध आहे.
  • ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले ‘माजुली’ हें जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे.
  • ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीतील ‘माराजो’ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे.
  • आसाममध्ये विध्वंसक महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या ब्रह्मपुत्रेस ‘आसामचे दुःखाश्रू’ म्हणतात.
  • ब्रह्मपुत्रा नदीस आसामची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखले जाते.
  • ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या : सुभानशिरी, धानशिरी, जयभोरेली, मानस, तिस्ता,भूरी – दिहिंग, दिसांग, कोपोली, कलांग, दिखू, कामेंग, बेलसिरी, चंपामन, गंगाधन, धारला, दिबू.

ब] भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या –

हिमालयीन नद्यांच्या तुलनेत या नद्या कमी लांबीच्या आहेत. वाहण्याच्या दिशेनुसार या नद्यांचे चार प्रकार पडतात.

अ] दक्षिण वाहिनी नद्या –
  • लुनी, साबरमती व मही.
  • लुनी व साबरमती या नद्या वायव्येकडील अरवली पर्वतात उगम पावतात.
  • अरवली पर्वतात पुष्कर दरीत उगम पावणारी ‘लुनी’ ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे.
  • लुनी नदी ‘लवणावरी’ किंवा ‘मिठाची नदी’ म्हणून ओळखली जाते.
  • मही नदी : ( उगम : विंध्य पर्वत ) मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातमधून वाहते.
  • या सर्व नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.
ब] उत्तर वाहिनी नद्या :
उत्तर भारतीय पठारावरून वाहणाऱ्या चंबळ,शोण,बेटवा,केन या उत्तर वाहिनी नद्या असून त्या बंगालच्या सागरास मिळतात.
क] पश्चिम वहिनी नद्या :
(नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरखोल, मांडवी, शरावती, पेरियार)

1) नर्मदा : लांबी – 1310 km

  • नर्मदा खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ – 97,795 चौकिमी.
  • नर्मदा खोऱ्याच्या देशात पाचवा क्रमांक लागतो. (द्विकल्पीय पठारात – चौथा क्रमांक)
  • उगम : मैकल टेकड्यांतील अमरकंटक (मध्य प्रदेश)
  • नर्मदा ही सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी.
  • नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतून वाहते.
  • नर्मदा पश्चिमेकडे वाहत जाऊन भरूच (भडोच) येथे अरबी समुद्रास मिळते.
  • प्रमुख उपनद्या : शक्कर, दुधी, तवा, बाऱ्हनेरा, बंजार, कोलार, हिरण, ओरसांग, शार, कुंडी, मंचक.

2) तापी नदी : 730 km.

  • तापी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : 65,145 चौकिमी.
  • उगम : मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात मुलताई येथे.
  • मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतून वाहते.
  • पश्चिमेकडे वाहत जाऊन सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते.
  • उपनद्या : उत्तर पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, अंभोरा, बोरी, खुरसी, गोगाई, बोकड, अनेर, अमरावती, अरुणावती,बेतूल, गंजाल.

3) शरावती : लांबी -128 km पश्चिम वाहिनी नदी.

  • उगम : तीर्थहळ्ळी (जि. शिमोगा, कर्नाटक)
  • संपूर्ण कर्नाटकात वाहते व अरबी समुद्रास मिळते.
  • ‘जोग’ चा धबधबा (गिरसप्पा धबधबा) शरावती नदीवर आहे.
ड] पूर्व वाहिनी नद्या :
दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी, कृष्णा, महानदी, पेन्नेरू,कावेरी.
पूर्ववाहिनी नद्या त्यांच्या एखाद्या मुख्य नदीस व मुख्य नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात.

1) गोदावरी :

  • गोदावरी खोऱ्याच्या संपूर्ण भारतात गंगा खोऱ्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.
  • गोदावरी खोऱ्याने संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या सुमारे 9.51% तर द्विकल्पीय पठारी प्रदेशाचे क्षेत्राच्या सुमारे 49% क्षेत्र व्यापलेले आहे.
  • गोदावरीच्या उगम : त्रंबकेश्वर ‘ब्रह्मगिरी’ (जिल्हा – नाशिक)
  • द्विकल्पीय पठारी प्रदेशातील सर्वाधिक लांबीची नदी. (प्रथम क्रमांक)
  • गोदावरीची भारतातील एकूण लांबी : 1465 km
  • गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी : 668 km
  • गोदावरी महाराष्ट्र तेलंगणा व आंध्र प्रदेश या तीन राज्यातून व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातून वाहते.
  • गोदावरी नदी आंध्र प्रदेशात राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
  • प्रमुख उपनद्या : दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, शबरी.

2) कृष्णा :

  • (कृष्णा खोरे संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक, द्वीपकल्पीय पठारावर दुसरा क्रमांक)
  • उगम : महाराष्ट्रातील, ‘महाबळेश्वर’ (जिल्हा : सातारा)
  • एकूण लांबी : 1400 km
  • महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यातून वाहते.
  • कृष्णा नदी आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरास मिळते.
  • प्रमुख उपनद्या : कोयना, वारणा, वेण्णा, वेरळा, पंचगंगा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा, मुशी, मुन्नेरु.

3) महानदी :

  • देशातील चौथ्या क्रमांकाचे व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाची खोरे.
  • उगम : छत्तीसगड मधील रायपुर जिल्ह्यात.
  • एकूण लांबी : 858 km
  • ओडिशा राज्यातील सर्वात मोठी नदी.
  • पूर्व घाटात महानदीपात्रात ‘सतकोसिया’ घळई निर्माण झाली आहे.
  • ओडिशातील कटक येथे बंगालच्या उपसागरास मिळते.
  • उपनद्या : हिराकूड, ईब, ओंग, मांद, तेल, शिवनाथ.

4) कावेरी :

  • पश्चिम घाटात कर्नाटकातील कूर्ग जिल्ह्यात ‘ब्रह्मगिरी’ येथे उगम.
  • नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी खोऱ्याच्या देशात पाचवा क्रमांक व द्विकल्पीय पठारी प्रदेशात चौथा क्रमांक लागतो.
  • तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागरास मिळते.
  • गोदावरीप्रमाणेच कावेरी नदीला देखील ‘दक्षिणगंगा’ म्हणून ओळखले जाते.
  • ‘शिवसमुद्रम’ (कर्नाटक) हा प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झाला आहे.
  • प्रमुख उपनद्या : हेमवती, हेरांगी, शिमसा, लक्ष्मणतीर्थ,काबनी, लोकपावनी,अर्कावती, सुवर्णावती, अमरावती इ.
An in-depth study of rivers and tributaries of India

  • भारतातील क्षेत्रानुसार नदीखोऱ्याच्या क्रम –
# गोदावरी खोरे ७ राज्यांतून पसरलेले आहे : १) महाराष्ट्र २) आंध्रप्रदेश ३) तेलंगणा ४) छत्तिसगढ ५) मध्यप्रदेश ६) ओडिशा ७) कर्नाटक

  • पश्चिम वाहिनी नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रांगांमधून वाहते.
  • सातपुडाच्या दक्षिणेस तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
  • पूर्ववाहिनी गोदावरी नदी, उत्तरेकडील सातमाळा – अजिंठा व दक्षिणेकडील हरिश्चंद्र – बालाघाट डोंगररांगांदरम्यान वाहते.
  • हरिश्चंद्र – बालाघाट व महादेव डोंगररांगांदरम्यान भीमा नदी पश्चिमेकडून – पूर्वेकडे वाहते.
  • भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान महादेव डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
  • सातमाळा – अजिंठा, हरिश्चंद्र – बालाघाट, महादेव या डोंगररांगा सह्याद्रीच्या (पूर्वेकडील) उपरांगा आहेत.

  • भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील वसलेली शहरे : —
  • खाऱ्या पाण्याची सरोवरे :
An in-depth study of rivers and tributaries of India

2 thoughts on “An in-depth study of rivers and tributaries of India भारतातील नद्या व उपनद्या यांच्या सखोल अभ्यास व माहिती”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र