भारतातील वनविषयक संकीर्ण माहिती
- राजस्थानच्या वाळवंटात सुईसारख्या लांब फांद्यांचे व पर्णविरहीत ‘खिप झुडुप’ या प्रमुख वृक्षाबरोबर खैर, फोग, निवडुंग, खेजरी, बेरी हे वृक्ष आढळतात.
- इस्त्रायली बाभूळ हा वृक्ष वाळवंटात वनीकरणासाठी वापरला जातो.
- राजस्थान वाळवंटात ‘जोजोबा’ या वृक्षाची आर्थिकदृष्ट्या लागवड केली जात असून तेथे जोजोबाच्या बियांपासून तेल काढले जाते.
- भूटाननजिक पूर्व हिमालयीन टेकड्या व पूरमैदाने यांमधील प्रवेशद्वार म्हणजे ‘दुआर’ (दार). दुआर प्रदेशात साल व शिसव हे प्रमुख वृक्ष आढळतात.
- गंगेच्या मैदानातील भांबर व तराई प्रदेशात साल व सेमल हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात.
- केनब्रेकस : गंगा त्रिभूज प्रदेशातील दाट उंच गवताळी भाग.
- गंगेच्या मुखाकडील मैदानात पश्चिम बंगालच्या त्रिभूज प्रदेशात सुंद्री वृक्ष आढळतात.
- विषुववृत्तीय प्रकारच्या वनांत ‘चंदन’ हा उच्च व्यापारी मूल्य असलेला वृक्ष आढळतो.
- दक्षिण सह्याद्रीतील उष्ण कटिबंधीय वने ‘शोला वने’ म्हणून प्रसिद्ध असून येथे निलगिरी व साग यांची लागवड केली आहे.
- किनारी भागात सामाजिक वनीकरणांतर्गत काजू, फणस यांची लागवड केली जाते.
- द्वीपकल्पीय पठारी भागात ‘सॅव्हाना’ (सुदान) प्रकाराशी साम्य असणारे गवताळ प्रदेश आढळतात.
- आसाममधील उंचचउंच गवताळ प्रदेश ‘दोआर्स’ या नावाने, तर उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी असणारे गवताळ प्रदेश ‘तराईचे प्रदेश’ या नावे ओळखले जातात.
- हिमालयातील उष्ण कटिबंधीय पानझडी वनांमध्ये ‘साल’ हा मौल्यवान वृक्ष आढळतो.
- समशीतोष्ण कटिबंधीय वनात ‘चिनार’ हा सूचीपर्णी वृक्ष आढळतो. चिनार हा जम्मू-काश्मिरचा राज्य वृक्ष आहे.
- भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी ५२ टक्के वनक्षेत्र हिमालयात आहे.अंदमान बेटांवरील ‘महोगनी’ वृक्षाचे लाकूड फर्निचर बनविण्यासाठी वापरले जाते.
- अंदमानच्या जंगलात धूप व रुद्राक्षाची झाडे आढळतात.
- तामिळनाडूमध्ये ‘पिचावरम’ ही मँयुव्ह वने आढळतात.
- पंजाब-हरियाणाच्या मैदानी प्रदेशात ‘अलबुखार’ वृक्ष आढळतो.
- वृक्षशेतीसाठी उपयुक्त वृक्ष साग, खैर, चंदन, मॅजियम.शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी ‘शिसव’, तर पंजाबमधील पतियाळा येथे ‘डाक’ वृक्ष आढळतो.
वनांचे उपयोग :
- बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यातून लाखेचे उत्पादन होते.
- लाखेचा उपयोग औषधे, रंग, ग्रामोफोन रेकॉर्ड, बांगड्यानिर्मिती अशा अनेक उद्योगांत केला जातो.
- बाभळीची साल कातडी कमविण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.
वनविषयक विविध अधिनियम –
- १८६४ : भारतात इंपिरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना होऊन डॉ. डिट्रिक ब्रांडिश हे जर्मन वन अधिकारी भारतातील पहिले वन महानिरीक्षक (इन्सपेक्टर जनरल) बनले.
- १८६७ इंपिरियल फॉरेस्ट सर्व्हिसची स्थापना.
- १९०५ : पर्यंत लंडनमधील कूपर्स हिल्स ही भारतीय वनाधिकाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट वन प्रशिक्षण संस्था मानली जात होती.
- १९०६ : डेहराडून येथे इंपिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना.
- १९२७ पासून या संस्थेत भारतीय वन अधिकाऱ्यांना (IFS) प्रशिक्षण दिले जाते.
- १९२७ : भारतीय वन अधिनियम संमत.
- १९७२ : केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम.
- १९८० साली स्थापन झालेल्या स्वायत्त वन विभागास १९८५ मध्ये स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाचा दर्जा
- १९८० : वन संवर्धन अधिनियम
- १९८६ : पर्यावरण संरक्षण अधिनियम
- १९ ऑक्टोबर १८९४ : पहिले राष्ट्रीय वन धोरण
- १९५२ दुसरे राष्ट्रीय वन धोरण
- १९८८ तिसरे राष्ट्रीय वन धोरण
- राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार १९७७ मध्ये ‘जंगल’ (वने) हा विषय राज्य व केंद्र सरकार यांच्यासमवर्ती सुचीमध्ये समाविष्ट.
- अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूट वल्लभगढ़ (हरियाणा)
- प्रोजेक्ट टायगर : १ एप्रिल १९७३ (उद्देश बंगाली वाघांची संख्या वाढविणे)
- २००३ : राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना (अहवाल : २००६)
- भारतात १९५२ पासून ‘वन महोत्सवास’ सुरुवात झाली.
- वनमहोत्सव सुरू करण्याचे श्रेय जाते भारताचे पहिले वनमंत्री कन्हैयालाल मुन्शी यांना.
- दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात ‘वन महोत्सव’ साजरा होतो.
भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने ( National Parks )
राष्ट्रीय उद्यान | स्थान ( जिल्हा ) | राज्य |
---|---|---|
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान | बोरिवली (मुंबई) | महाराष्ट्र |
ताडोबा राष्ट्रीय उद्यान ( वाघ व मगरीसाठी ) | चंद्रपूर | महाराष्ट्र |
प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान | सिवनी | मध्यप्रदेश |
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान | गोंदिया | महाराष्ट्र |
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी) | नैनिताल (रामनगर) | उत्तराखंड |
बंदीपूर राष्ट्रीय उद्यान | म्हैसूर | कर्नाटक |
शिवपुरी राष्ट्रीय उद्यान | शिवपुरी | मध्यप्रदेश |
कान्हा राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी) | मांडला | मध्यप्रदेश |
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (एकशिंगी गेंडा) | जोरहाट | आसाम |
भरतपूर राष्ट्रीय उद्यान (पक्ष्यांसाठी) | भरतपूर | राजस्थान |
बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान (हत्ती) | बंगळूरू | कर्नाटक |
वाल्वादार राष्ट्रीय उद्यान (लांडगे) | भावनगर | गुजरात |
गिंडी राष्ट्रीय उद्यान | चेन्नई | तामिळनाडू |
नागरहोल राष्ट्रीय उद्यान | कुर्ग | कर्नाटक |
बेटला राष्ट्रीय उद्यान (वाघ) | पलामू | झारखंड |
कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान (सिंह) | शिवपूर – मोरेना | मध्य प्रदेश |
नवी राष्ट्रीय उद्याने –
१) देहिंग पत्काई, आसाम (मे २०२०),
२) रायमोना नॅशनल पार्क, आसाम (जून २०२१)
- टीप : १९८१ साली स्थापन झालेल्या कुनो अभयारण्यास डिसेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा.
- गुजरातमधील गीर अभयारण्यानंतर कुनो-पालपूर हे आशियाई सिंहांचे भारतातील दुसरे घर बनले आहे. Project Cheetah : १७ सप्टेंबर २०२२ रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिवियाहून आणलेले चित्ते सोडण्यात आले.
- भारतातून १९५२ साली नामशेष झालेला चित्ता ७० वर्षांनी पुन्हा भारतात आला ।
भारतातील प्रमुख अभयारण्ये :
- डिसेंबर २०२२ अखेर भारतातील वन्यजीव अभयारण्यांची संख्या : ५६५
- क्षेत्र : १,२२,५६२ चौकिमी (३.७३%)
- व्याघ्र प्रकल्पांची संख्या : ५५
- अंदमान-निकोबार केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक ९४ अभयारण्ये आहेत.
अभयारण्यांच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम :
१) महाराष्ट्र (५०), २) कर्नाटक (३५), ३) तामिळनाडू (३१), ४) हिमाचल प्रदेश (२८)
अभयारण्य | प्राणी/पक्षी | स्थान (राज्य) |
---|---|---|
कर्नाळा अभयारण्य | पक्षी | रायगड (महाराष्ट्र) |
माळढोक अभयारण्य | पक्षी | नगर-सोलापूर (महाराष्ट्र) |
इंद्रावती अभयारण्य | वाघ | छत्तीसगढ |
सुलतानपूर लेक (तलाव) अभयारण्य | पक्षी | गुरगाव (हरियाणा) |
सिमलीपाल अभयारण्य | वाघ | मयूरभंज (ओडिशा) |
दाचिंगम अभयारण्य | हंगूल-हरीण | श्रीनगर (जम्मू-काश्मीर) |
रणथंबोर अभयारण्य | वाघ | सवाई माधवपूर (राजस्थान) |
घटप्रभा अभयारण्य | पक्षी | घटप्रभा (कर्नाटक) |
मानस अभयारण्य | वाघ | बारपेटा (आसाम) |
सुदरबन अभयारण्य | वाघ | चौवीस परगणा (प. बंगाल) |
रंगनथिट्ट अभयारण्य | पक्षी | म्हैसूर (कर्नाटक) |
दालमा अभयारण्य | वाघ | सिंगभूम (झारखंड) |
इटांगकी अभयारण्य | हत्ती | कोहिमा (नागालँड) |
दांडेली अभयारण्य | वाघ | दांडेली (कर्नाटक) |
परंबीकुलम अभयारण्य (३८ वा व्याघ्रप्रकल्प) | वाघ | पालघाट (केरळ) |
कावल अभयारण्य (४२ वा व्याघ्रप्रकल्प) | वाघ | आदिलाबाद (तेलंगणा) |
- पंजाबमधील तरण तारण साहीब जिल्ह्यात हरी-के-पत्तन’ राष्ट्रीय पाणथळीचा प्रदेश येथे अभयारण्य विकसित झाले आहे.
- भारतात राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांखालील क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ५.०५% इतके आहे.
- भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड (१९३६).
- मणिपूरमधील लोकटाक सरोबरात ”किबुल लामजाओ” हे जगातील सर्वात मोठे तरंगते अभयारण्य असून येथे ‘सांगाई’ हे दुर्मिळ हरीण आढळते.
- लोकटाक सरोवर हे ईशान्य भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे तरंगते सरोवर आहे.
- आसाममधील कर्बी आंगलांग जिल्ह्यात ‘गरमपाणी वन्यजीव अभयारण्य’ आहे पश्चिम घाटात एकूण १३ राष्ट्रीय उद्याने व २० वन्यजीव अभयारण्ये आहेत.
- कच्छच्या आखातात सागरी राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात आले आहे.
