General information about the geography of Maharashtra : महाराष्ट्राचा भूगोलाची जनरल माहिती

General information about the geography of Maharashtra

  • राज्यातील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर (उंची १६४६ मी.) सह्याद्री रांगांत आहे.
  • दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते; तिला रेगुर म्हणतात.
  • आंबोली (जि. सिंधुदुर्ग, कोकण) येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस.
  • बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार‘ हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर.
  • नागपूरची – संत्री, जळगावची – केळी, नाशिकसांगलीची – द्राक्षे, रत्नागिरीचा – हापूस आंबा प्रसिद्ध आहे.
  • मुंबई : महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी.
  • नागपूर : राज्याची उपराजधानी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार या नागभूमीतच केला.
  • कोयना वीजकेंद्र, जायकवाडी धरण, तारापूरचे अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील ‘बॉम्बे हाय’ तेलक्षेत्र व इतर अनेक उद्योगधंद्यांनी राज्याच्या वैभवात भर टाकली आहे.
  • ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारे मुरूड-जंजिरा, सिंधुदुर्ग, समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मघर असलेला शिवनेरी, राजमाता जिजाऊंचे माहेरघर असलेला सिंदखेड राजा; रायगड आदी प्रेक्षणीय किल्ले.
  • शेती हा राज्यातील प्रमुख व्यवसाय.
  • महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणी असून पंश्चिमेकडील ७२० किमीची कोकण किनारपट्टी हा या त्रिकोणाचा पाया, तर राज्याचे पूर्व टोक हा या त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे.
  • ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी याने गुजरात व उत्तर कोकण या प्रदेशास ‘लारिका’, तर दक्षिण कोकणास ‘आरिका‘ असे संबोधले आहे.
  • ४ ऑक्टोबर २०२४ : अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


* कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १ मे २०२० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हीरकमहोत्सव साधेपणाने संपन्न झाला.


क्षेत्रफळ : ३,०७,७१३ चौकिमी (३०.७७१३ द.ल. हेक्टर; किंवा १,१८,८०९ चौ. मैल)

  • मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार : १५° ४८’ उत्तर ते २२° ६’ उत्तर अक्षांश
  • मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार : ७२° ३६’ पूर्व ते ८०° ५४’ पूर्व रेखांश
  • पूर्व-पश्चिम लांबी : सुमारे ८०० कि.मी. (४९७ मैल)
  • दक्षिणोत्तर रुंदी : सुमारे ७२० कि.मी.
  • स्थान: भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून.
  • शेजारची राज्ये : महाराष्ट्रच्या वायव्येस : गुजरात राज्य, ‘दादरा नगरहवेली आणि दमण-दीव’ हा केंद्रशासित प्रदेश
  • उत्तरेस : मध्य प्रदेश पूर्वेस व ईशान्येस : छत्तीसगढ
  • आग्नेयेस : तेलंगणा राज्य दक्षिणेस : कर्नाटक नैऋत्येस: गोवा
  • लोकसंख्या : (२००१) : ९,६८,७८,६२७
  • २०११ चा अंतिम निष्कर्ष : ११,२३,७४,३३३
  • भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण: ९.४२% (२००१) * ९.२८% (२०११)
  • विधानसभा मतदारसंघ : २८८
  • विधानपरिषद मतदारसंघ : ७८
  • राज्यातील लोकसभा मतदारसंघ : ४८
  • राज्यातील राज्यसभा मतदारसंघ : १९
  • राज्यातील जिल्हे : ३६ (पालघर हा ३६ वा जिल्हा. क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा, तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा)
  • जिल्हा परिषदा : ३४ (पालघर ३४ वी जिल्हा परिषद. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत.)
  • तालुके : ३५८ (३५५+३)
  • ग्रामपंचायती : २७,९१३
  • पंचायत समित्या : ३५१
  • महानगरपालिका : २९
  • नगरपरिषदा : २४५
  • नगरपंचायती : १४६
  • कटक मंडळे :
  • शहरे : ५३४
  • वस्ती असलेली गावे : ४०,९५९
  • वस्ती नसलेली गावे : २,७०६
प्रादेशिक विभागसमाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हेजिल्हे
विदर्भ (वऱ्हाड)अमरावती विभाग : सर्व ५ जिल्हे, नागपूर विभाग : सर्व ६ जिल्हे११
पश्चिम महाराष्ट्रपुणे विभाग : सर्व ५ जिल्हे नाशिक विभाग : नाशिक व अहमदनगर (२)
मराठवाडा (गोदावरी खोरे)छ. संभाजीनगर विभाग सर्व ८ जिल्हे
कोकण विभागकोकण विभाग : सर्व ७ जिल्हे
खानदेश (तापी खोरे)नाशिक विभाग : धुळे, नंदूरबार, जळगाव (३)
एकूण३६

१) छत्रपती संभाजीनगर (६४,८१३ चौ. किमी), २) नाशिक, ३) पुणे, ४) नागपूर, ५) अमरावती,

६) कोकण (३०,७४६ चौ. किमी सर्वात कमी)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • १९८० पर्यंत राज्यात २६ जिल्हे अस्तित्वात होते.
  • १९८१ नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून आजअखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या ३६ इतकी झाली आहे.
  • सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा.
  • गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा.

१) अहमदनगर (१७,०४८ चौकिमी, सर्वाधिक), २) पुणे (१५,६४३ चौकिमी), ३) नाशिक (१५,५८२ चौकिमी),

४) सोलापूर (१४,८९५ चौकिमी), ५) गडचिरोली (१४,४१२ चौकिमी).

१) मुंबई शहर (१५७ चौकिमी, सर्वात कमी), २) मुंबई उपनगर (४४६ चौकिमी), ३) भंडारा (३,८९६ चौकिमी),

४) ठाणे (४, २१४ चौकिमी), ५) हिंगोली (४,५२६ चौकिमी).


Bhartiwalabhau.com

1 thought on “General information about the geography of Maharashtra : महाराष्ट्राचा भूगोलाची जनरल माहिती”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र