Marathi Grammer Sarav Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट January 18, 2025January 18, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Sarav Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 301. 'साखरभात' या शब्दाचे लिंग कोणते? A. उभय लिंगी B. पुल्लिंगी C. स्त्रीलिंगी D. नपुंसक लिंगी 2 / 302. खालीलपैकी भाववाचक नामांचा गट ओळखा. A. औदार्य, शौर्य, क्रौर्य, धैर्य B. राज्य, कृष्णा, सह्याद्री, पृथ्वी C. शुक्र, चंद्र, ग्रह, महाराष्ट्र D. ओरड, माकड, बोकड, कापड 3 / 303. ऊ-कारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्यरूप आ-कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? A. वधू-वधूचा B. नातू-नातवाचा C. कोकरू-कोकराने D. आसू-आसवाने 4 / 304. मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ? A. सात B. सहा C. पाच D. आठ 5 / 305. वसंततालिका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते? A. पाचव्या B. सातव्या C. सहाव्या D. आठव्या 6 / 306. पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा. A. जगन्नाथ B. घावपती C. पुनर्जन्म D. मन्वंतर 7 / 307. शुध्द शब्द कोणता ? A. पारितोषिक B. पारीतोषिक C. पारितोषीक D. पारीतोषीक 8 / 308. "क्षणैक" शब्दाचा विग्रह सांगा. A. क्षण + एक B. क्षण + ऐक C. क्षणै + एक D. क्षणै + क 9 / 309. 'क्षणभंगुर गोष्ट' यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता ? A. ईन-मिन-साडेतीन B. अडणीवरचा शंख C. अळवावरचे पाणी D. अवकाळी 10 / 3010. 'पाय धू, तर म्हणे तोडे केवढयाचे' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ? A. दुसऱ्याच्या दागिन्याची किंमत विचारणे B. दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे C. स्वतःचे काम सोडून नको त्या चौकश्या करणे D. दुसऱ्यास कमीपणा आणणे 11 / 3011. खालीलपैकी विशेषनामांचा कोणता गट बरोबर आहे ? A. सोने, तांबे, साखर B. कळप, वर्ग, समिती C. नाशिक, सहयाद्री, अमेय D. राक्षस, अफारा, देव 12 / 3012. 'जर्जर' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ? A. वृध्द B. निरोगी C. रोगी D. अशक्त 13 / 3013. 'वल्कल' या शब्दाचा अर्थ काय ? A. प्राण्यांच्या चामडीपासुन बनविलेले वस्त्र B. झाडाच्या सालीपासुन बनविलेले वस्त्र. C. कापसापासुन बनविलेले वस्त्र. D. सिंथेटिक दोऱ्यापासुन बनविलेले वस्त्र. 14 / 3014. मंगेश अभ्यास करीत नाही, म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील 'म्हणून' हा शब्द खालील पैकी कोणते अव्यय आहे? A. शब्दयोगी B. केवलप्रयोगी C. उभयान्वयी D. धातुसाधित शब्दयोगी 15 / 3015. ' हलवायचा घरावर तुळशीपत्र' या म्हणीचा अर्थ काय आहे? A. आरोग्यासाठी गोड खाणे सोडून देणे B. श्रीमंत माणसाच्या आयुष्यात अचानकपणे मोठे संकट येणे C. स्वतःस झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे D. श्रीमंतांच्या घरी अचानक गरिबी येणे 16 / 3016. 'गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? A. अरबी B. फारसी C. पोर्तुगीज D. गुजराती 17 / 3017. ' आम्ही उद्या गावी जाऊ'. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. A. संबंधी B. आत्मवाचक C. पुरुषवाचक D. दर्शक 18 / 3018. 'वारंवार' हे कोणते अव्यय आहे? A. आवृत्तीवाचक B. संख्यवाचक C. रीतीवाचक D. स्थळवाचक 19 / 3019. 'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? A. अव्ययीभाव B. द्वंद C. बहुव्रीही D. तत्पुरुष 20 / 3020. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा? A. पळवते B. पाहतो C. बसतो D. नाही 21 / 3021. अलंकार ओळखा. ' लेकी बोले सुने लागे.' A. अतिशयोक्ती B. अन्योक्ती C. स्वभायोक्ती D. यमक 22 / 3022. 'रामा इकडे ये' या वाक्यातील कारकार्थ सांगा. A. कर्ता B. कर्म C. संबोधन D. क्रियापद 23 / 3023. ' मरणात खरोखरच जग असते.' या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे. A. संसदेह अलंकार B. उत्प्रेक्षा अलंकार C. दृष्टांत अलंकार D. विरोधाभास अलंकार 24 / 3024. साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? A. कुसुमाग्रज B. गोविंदाग्रज C. केशवसूत D. केशवकुमार 25 / 3025. संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा. A. आडवळण, अदकोस, अबोल, निनावी B. पडताळा, फटकळ,भरधाव, अवकळा C. अभिनय, अवमान, अनुभव, अतिरेक D. निलाजरा, अवघड, पडसाद, अदपाव 26 / 3026. जा, ये, उठ, कर, बस, या मूळ धातूंना काय म्हणतात? A. उभयविध धातू B. सिद्ध धातू C. साधित धातू D. अकर्मक धातू 27 / 3027. 'एकच प्याला' हे नाटक कुणी लिहिले आहे? A. अण्णासाहेब किर्लोस्कर B. राम गणेश गडकरी C. भालजी पेंढारकर D. गोविंद ब. देवल 28 / 3028. 'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक.............आहे. A. प्र. के. अत्रे B. ग. दि. मांडगुळकर C. आनंद यादव D. व्यंकटेश माडगुळकर 29 / 3029. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? A. ग. ल. ठोकळ B. बालकवी C. वि. द. घाटे D. केशवसुत 30 / 3030. समानार्थी म्हण शोधा. "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग" A. खाऊ जाणे तो पचवू जाणे B. जशी कुडी तशी पुडी C. बुडत्याचे पाय खोलात. D. पी हळद नि हो गोरी Your score isThe average score is 53% 0% Restart quiz