मराठी व्याकरण प्रकरण – विरामचिन्हे

महत्वाचे : विरामचिन्हे इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहेत.

आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला ‘विराम‘ असे महणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात. अशा चिन्हांना ‘विरामचिन्हे‘ असे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे? अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून विरामचिन्हांना लेखनात महत्त्व असते. अशा चिन्हांचा वापर केव्हा व कोठे करावा हे समजून घ्यावे लागते. जर उद्‌गारातील भाव सौम्य प्रकारात असेल तर स्वल्पविराम द्यावा.


१) विराम दर्शविणारी : पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम इ.

२) अर्थबोध करणारी : प्रश्नचिन्ह, उद्‌गारवाचक चिन्ह.


चिन्हांची नावे चिन्ह केव्हा वापरतात ?उदाहरण
पूर्णविराम .१) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी
२) शब्दांच्या संक्षेप दाखविण्यासाठी आद्यक्षरांपुढे
१) ती घरी आली.
२) आर.आर.पाटील.
अर्धविराम ;दोन छोटी वाक्ये, उभायान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा.त्याने खूप अभ्यास केला ; परंतु चांगले गुण मिळाले नाहीत.
स्वल्पविराम , एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास , अवतरणातील वाक्य व
बाहेरील वाक्य वेगवेगळे दाखवण्यासाठी ,संबोधन वेगळे दाखविण्यासाठी,
अनेक छोट्या घटना दाखवण्यासाठी.
१) मला कथा,नाटके,कादंबऱ्या आवडतात.
२) मधू म्हणाला, “इकडे ये.”
३) गुरुजी आले, माझ्याकडे बघितले,किंचित हसले, खुर्चीत बसले.
अपूर्ण विराम :वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले :
१, ८, १४, २७, ४०
प्रश्नचिन्ह ?प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटीतू कसा आहेस ?
उद्गारचिन्ह !उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या / वाक्याच्या शेवटी १) अरेरे ! तो नापास झाला.
२) शाबास ! छान खेळलास.
अवतरण चिन्हे ” ”


‘ ‘
(दुहेरी) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता .

(एकेरी) एखादा शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास , दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना.
१) तो म्हणाला, “मी येईन.”

२) मुलध्वनींना ‘वर्ण’ असे म्हणतात.
संयोग चिन्ह १) दोन शब्द जोडताना.
२) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
१) विद्यार्थी – भांडार
२) पुढील कार्यक्रम शाळेच्या खेळा –
च्या मैदानावर होतील .
अपसारण चिन्ह (डॅश)
(स्पष्टीकरण चिन्ह)
_१) बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास.
२) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास
१) मी तेथे गेलो, पण _

२) तो मुलगा _ ज्याने बक्षीस मिळविले _आपल्या शाळेतील आहे.
विकल्प चिन्ह / पर्याय दाखविणे मी चहा / कॉपी घेतो.

Marathi Grammar Practice Test मराठी व्याकरण सराव टेस्ट

2 thoughts on “मराठी व्याकरण प्रकरण – विरामचिन्हे”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र