26 November Constitution Day Useful Educational Information 26 नोव्हेंबर संविधान दिवस उपयुक्त अभ्यासात्मक माहिती

26 नोव्हेंबर संविधान दिन :


संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनालाच राष्ट्रीय विधी दिन असेही म्हणतात. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले. संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असते. तर त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. संविधानाशिवाय देश चालवता येत नाही, म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल श्यामाप्रसाद मुखर्जी,मौलाना अब्दुल कलाम, आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. तर डॉ. भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महीने आणि 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, 1 वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.

2015 मध्ये भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. 2015 हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्यावर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून, संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड , ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानच्या संविधानांमधून घेतले गेले आहेत. यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्य, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे. देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी, अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत. या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाडण्याची शपथ घेतली पाहिजे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्दिष्ट पूर्ण होईलच शिवाय, संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल. आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशापेक्षा वाईट आहे. त्याला अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना शोषणाचे बळी व्हावे लागते. मित्रांनो, आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे. आर्थिक विषमतेची खोलदरी कमी करूनच राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

भारतीय राज्यघटनेच्या सरनामा :

  • आम्ही भारतीय लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरीकांना-
  • न्याय – सामाजिक, आर्थिक आणि राजकीय;
  • स्वातंत्र्य – विचार, उच्चार, श्रध्दा, धर्म व उपासना यांचे :
  • समानता – दर्जा आणि संधी याबाबतीत ;
  • बंधुता – व्यक्तीची प्रतिष्ठता आणि राष्ट्राची एकात्मता व अखंडता राखणारी; याबाबत शाश्वती देण्याचे आज दिनांक 26 नोव्हें 1949 रोजी आमच्या या घटनासमितीत विचारपूर्वक स्वीकृत व संमत करीत आहोत.

भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या तारखा :

  • घटना समीतीचे पहिले अधिवेशन – 9 डिसेंबर 1946
  • मसुदा समितीची निर्मीती – 29 ऑगस्ट 1947
  • राज्यघटना संमत झाली – 26 नोव्हेंबर 1949
  • राज्यघटनेची अंमलबजावणी – 26 जानेवारी 1950
  • राष्ट्र ध्वजाला घटना समितीची मान्यता – 22 जुलै 1947
  • राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता – 24 जानेवारी 1950
  • पहिल्या राष्ट्रपतीची निवड – 24 जानेवारी 1950
  • सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात – 26 जानेवारी 1950
  • राजमुद्रेला घटना समितीची मान्यता – 26 जानेवारी 1950
जगातील प्रमुख संविधानांवरून भारतीय संविधानात स्वीकारण्यात आलेले तत्वे :
26 November Constitution Day Useful Educational Information 26 नोव्हेंबर संविधान दिवस उपयुक्त अभ्यासात्मक माहिती

3 thoughts on “26 November Constitution Day Useful Educational Information 26 नोव्हेंबर संविधान दिवस उपयुक्त अभ्यासात्मक माहिती”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र