विषय : इतिहास [महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी थोडक्यात माहिती व सराव प्रश्न

  • २२ एप्रिल १९०६ रोजी ‘युगांतर’ या बंगाली साप्ताहिकात बारिंद्रकुमार घोष यांनी क्रांतिकारकांसाठी तपशीलवार कार्यक्रम सुचविला होता. पंजाब व महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनी हाच कार्यक्रम अनुसरला. तो पुढीलप्रमाणे
  1. ब्रिटिशांविषयी जनतेत द्वेष फैलावणे.
  2. तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे.
  3. शस्रे गुप्तपणे देशात तयार करणे, गरज भासल्यास परदेशातून मिळवणे.
  4. क्रांतिकार्यासाठी लागणारे धन श्रीमंतांना लुटून मिळवणे.
  5. ऐतिहासिक भारतीय सेनानींचा पराक्रम व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून जनतेत स्वाभिमान निर्माण करणे.
  • जुलमी ब्रिटिश धोरणांमुळे १८९६ नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतीकडे वळले.

वासुदेव बळवंत फडके :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची खऱ्या अर्थान सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली, त्यामुळे त्यांना ‘आद्य क्रांतिकारक’ असे संबोधले जाते.”
  • जन्म ४ नोव्हेंबर १८४५. शिरढोण (ता. पनवेल, जि. कुलाबा-रायगड)

टोपण नाव: वासुदेवांचे आजोबा प्रेमाने त्यांना ‘छकड्या’ म्हणत असत.”

पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी फडकेंच्या घराण्याकडे होती, मात्र मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ही सुभेदारी गेली. उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाल्याने त्यांना इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही.

उस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे फडके यांनी शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेतले.

१० फेब्रुवारी १८६० रोजी ‘गोपिकाबाई’ यांच्याशी वासुदेवांचा विवाह. कन्येचे नाव: मथुताई

फडकेंनी काही काळ GIP रेल्वेमध्ये लिपिक म्हणून, तर नंतर लष्करात लेखाविभागात नोकरी केली.

आईच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व इंग्रजांविरोधी त्यांच्या मनात असंतोष वाढला. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत हे त्यांना पटले.

वासुदेव फडके यांच्यावर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने ते सार्वजनिकसभेकडे आकर्षित झाले.

  • १८७३ मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली.
  • बासुदेव बळवंत फडके यांनी पुढील संस्था स्थापन केल्या-

१) ऐक्यवर्धिनी सभा: विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू.

२) ‘पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन (स्कूल): १८७४ मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी फडकेंनी पुण्यात ही शाळा सुरू केली. पुढे या संस्थेचे ‘भावे स्कूल’ मध्ये रूपांतर झाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • फडके दत्ताचे भक्त असल्यामुळे त्यांनी ‘दत्त महात्म्य’ हे ५१ अध्याय व ७१७४ ओव्यांचे दत्तचरित्र लिहिले.
  • १८७७ मध्ये लॉर्ड लिटन याने व्हिक्टोरिया राणीस ‘भारताची सम्राज्ञी’ हा किताब दिल्याने फडके क्रोधित झाले.
  • सनदशीर मार्गाने इंग्रजांचा पराभव करता येणार नाही हे पटल्यामुळे त्यांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबिला.

वासुदेव बळवंत फडके यांचे क्रांतिकार्य: २० फेब्रुवारी १८७९ नंतर फडके यांनी रामोशी, कोळी, भिल्ल, मांग, हरिजन, मुसलमान आदी जातीधर्मातील सहकाऱ्यांना एकत्र करून पुणे परिसरात श्रीमंतांवर दरोडे घालण्यास प्रारंभ केला.

  • दौलतराव नाईक यांच्या मदतीने फडकेंनी लोणीजवळील धामरी या गाबी पहिला दोडा घातला. त्यानंतर खेड, वाल्हे, पुरंदर येथे दरोडे घातले. लुटीतील पैशाचा विनियोग त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी केला.
  • सरकारी खजिन्यांपेक्षा फडकेंनी श्रीमंतांना लुटण्यास प्राधान्य दिले.
  • दरोड्यांच्या माध्यमातून फडकेंनी कोकण व पुण्यासह सात जिल्ह्यांत ब्रिटिशांविरोधी मोहिम उभारली.
  • आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवून साधूचा वेश धारण केला व जनजागृती करत फिरत राहिले.
  • वासुदेव बळवंत फडके यानी इंग्रजांना उद्देशून दोन जाहीरनामे काढून बंडाची धमकी दिली.
  • पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने फडकेंच्या ‘१२९, शुक्रवार पेठ, पुणे’ या पत्त्यावर धाड टाकून शस्त्रास्त्रे जप्त केली व फडकेंवर अटक वॉरंट काढले.
  • मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी फडकेंना पकडणाऱ्यास चार हजार रुपयांचे बक्षिस घोषित केले.
  • त्याविरोधात फडकेंनी रिचर्ड टेम्पल यांचे डोके उडविणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षिस घोषित केले.
  • २३ जुलै १८७९ रोजी विजापूरजवळील देवर नावडगी येथे फडके यांना अटक करण्यात आली.
  • २२ ऑक्टोबर १८७९ पासून न्या. अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला.

सार्वजनिक काका ऊर्फ ग. वा. जोशी आणि महादेव चिमणाजी आपटे यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारले.

  • त्यानंतर फडकेंवर ब्रिटिशांविरुद्ध युद्धाचा आरोप ठेवून हा खटला सत्र न्यायाधीश न्यूनहॅम यांच्याकडे सोपविण्यात आला.
  • भारतीय दंडविधान संहिता कलम १२ अ, १२२ व १२४ नुसार फडके यांच्यावर समाजात असंतोष पसरविण्याचा आरोप ठेवण्यात आला.
  • महादेव चिमाजी आपटे यांनी उच्च न्यायालयात फडकेंच्या बचावाचे काम पाहिले.
  • मात्र फडकेंना राजद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेप सुनावण्यात आली.
  • ३ जानेवारी १८८० रोजी ‘तेहेरान’ बोटीने फडकेंना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात धाडण्यात आले.
  • १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या तुरुंगात वयाच्या ३७ व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला.

बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने नोव्हेंबर १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव ‘देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ या शब्दांत केला.

विश्राम बेडेकर यांनी १९५० साली ‘वासुदेव बळवंत’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

२२ जून १८९७ रोजी पुण्यात प्लेग प्रतिबंधाच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा पुण्याचा जुलमी प्लेग कमिशनर रंड व त्याचा सहकारी लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्त्या (गणेश खिंडीत) दामोदर व बाळकृष्ण हरीचाफेकर या बंधूंनी केली. रँडची हत्त्या ही भारतात युरोपियनाची झालेली पहिली हत्त्या.

याच दिवशी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा साठावा वर्धापनदिन पुण्यातील राजभवनात चालू होता.

  • रँड हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश द्रविड या फितूरास वासुदेव चाफेकर व म. वि. रानडे यांनी ठार केले
  • या प्रकरणी दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे तिन्ही चाफेकर बंधू आणि म. वि. रानडे या चौघांनाही फाशी.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर :

  • जन्म : २८ मे १८८३, भगूर, जि. नाशिक
  • निधन : २६ फेब्रुवारी १९६६, दादर (मुंबई)
  • ‘मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी प्रतिज्ञा सावरकरांनी बालवयातच अष्टभूजा भगवती या कुलदेवतेसमोर केली होती.
  • वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी ‘स्वदेशीचा फटका’; ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ ही काव्य रचली.
  • विद्यार्थीदशेत सावरकरांवर दामोदर चाफेकर यांच्या फाशीचा (बलिदानाचा) प्रभाव होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य:

  • पागे व म्हसकर यांच्या साथीने ‘राष्ट्रभक्त समूह’ ही संघटना स्थापन केली.
  • १ जानेवारी १९०० : भगूर येथे ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना. मित्रमेळा ही राष्ट्रभक्त समूहची शाखा होती.
  • मे १९०४ : मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ या संघटनेत झाले. ‘अभिनव भारत’चे मुख्यालय : नाशिक
  • जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संघटनेच्या धर्तीवर अभिनव भारतची स्थापना करण्यात आली.
  • श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये सुरू केलेल्या ‘छत्रपती शिवाजी स्कॉलरशिपची’ मदत घेऊन जून १९०६ मध्ये सावरकर कायद्याच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. लंडन येथे क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी सावरकरांनी ‘इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र’ तसेच ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ (इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स-१८५७) हे ग्रंथ लिहिले.
  • लंडनमधून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी बाड्मयातून पिस्तूले पाठविली.
  • अभिनव भारतच्या क्रांतिकार्याचा सुगावा लागताच ब्रिटिशांनी १९०९ मध्ये सावरकरांचे ज्येष्ठ बंधु गणेश ऊर्फ बाबाराव यांना अटक केली, नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने बाबारावांना काळ्या पाण्याची सजा सुनावली.
  • यामुळे अनंत लक्ष्मण कान्हेरे (वय १८) या अभिनव भारत संघटनेच्या नेत्याने २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्त्या केली. (या दिवशी तेथे देवल नाट्यकंपनीचे ‘संगीत शारदा’ नाटक चालू होते)
  • गणू वैद्य याने पोलिसांना अभिनव भारतच्या क्रांतिकारकांची माहिती पुरविली.
  • जानेवारी १९१० मध्ये वि. दा. सावरकर पॅरिसला गेले, त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना फरारी घोषित केले.
  • वि. दा. सावरकर परिसहून इंग्लंडला आले असता जॅक्सनच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक करण्यात आली.
  • खटल्यासाठी ‘मोरिया’ या बोटीतून भारतात आणताना फ्रान्सच्या समुद्रात मार्सेलिस जवळ ८ जुलै १९१० रोजी त्यांनी बोटीतून धाडसी उडी टाकून पलायनाचा अयशस्वी प्रयत्न केला.
  • २२ मार्च १९११ रोजी नाशिक येथील कोटनि वि. दा. सावरकरांना ५० वर्षांची शिक्षा ठोठावली व त्यांची रवानगी अंदमान तुरूंगात करण्यात आली.
  • याप्रसंगी ‘५० वर्षे । तोवर ब्रिटिश सरकार टिकले तर ना!’ हे तेजस्वी उद्‌गार २८ वर्षीय सावरकरांनी काढले.
  • १९२४ साली सावरकरांना अंदमानातून हलवून रत्नागिरी येथे स्थानबध्द करण्यात आले.
  • १९३७ मध्ये प्रांतात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने सावरकरांची सुटका केली.
  • १९३८ साली मुंबई येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
  • सावरकरांनी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा, बंदुका घ्या’ असे आवाहन केले.
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांची ग्रंथ संपदा : माझी जन्मठेप (आत्मचरित्र), शत्रूच्या शिबिरात, अथांग
  • काव्यसंग्रह: कमला, गोमंतक, सप्तर्षी, विरहोच्छवास
  • १९२३ साली वि.दा. सावरकर यांनी ‘हिंदूत्व व हिंदू कोण’ हा ग्रंथ लिहून राष्ट्रवाद व्यक्त केला. या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन १९२५ साली नागपूर येथे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची’ स्थापना करण्यात आली.
  • आप्पा रामचंद्र कासार हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंगरक्षक होते, तर गजानन विष्णू दामले हे त्यांचे सचिव होते.

संपूर्ण नाव: पांडुरंग महादेव बापट, गाव पारनेर (जि. अहमदनगर)

  • महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी ‘पारतंत्र्यात अडकलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी यावज्जीव कायावाचामनाने झटण्याची व त्यासाठी बलिदान करण्याची शपथ घेतली होती.
  • मुंबईत बी. ए. पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीआधारे १९०४ मध्ये ते लंडनला गेले.
  • एडिंबरो येथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
  • लो. टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी आपल्या इंडिया हाऊस मध्ये सेनापती बापटांची सोय केली.
  • फ्रान्समधील पॅरिस येथे जाऊन सेनापती बापट बॉम्बविद्या शिकून आले.
  • भारतात परतल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना कैद केले व काही दिवसांनी पुराव्याअभावी सोडून दिले.
  • १९१४ नंतर क्रांती मार्गाचा त्याग करून सेनापतींनी विधायक कार्यास वाहून घेतले.
  • १९२० पूर्वी लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान व प्रेरणास्थान होते. या काळात
  • महाराष्ट्रभर लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना स्थापन झाल्या त्या पुढीलप्रमाणे-
  • आर्य बांधव समाज वर्धा व नागपूर (क्रांतिकारक श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर)
  • यवतमाळची गुप्त संघटना डॉ. सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजणे, टोंगे.
  • अमरावतीची गुप्त संघटना दादासाहेब खापर्डे. बेळगाव येथील गुप्त संघटना (१९०४) गंगाधर देशपांडे.
  • हैद्राबादची गुप्त संघटना नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर, सातवळेकर.
  • १८९९ साली बीड येथे सदाशिव नीळकंठ जोशी यांनी ब्रिटिशांविरोधी उठावाचा प्रयत्न केला.
  • कोल्हापूर येथील ‘शिवाजी क्लब’
  • पुणे येथील ‘चाफेकर क्लब’
  • १९०५ साली बडोदा संस्थानात चांदोड येथे अरविंद घोष, माधवराव जाधव यांनी ‘गंगानाथ भारती विद्यालय ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली.
  • नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी १९०४ च्या दरम्यान नेपाळमध्ये शिवाजी क्लबचे सदस्य असलेल्या हणमंतराव कुलकर्णी यांच्या सहाय्याने बंदुकीचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. नेपाळच्या पंतप्रधानांनी सकारात्मक बाजू घेतल्यामुळे खाडीलकर ब्रिटिशांच्या चौकशीतून निसटले.
  • सोलापूरचे गोविंद पोतदार यांनी जपानमध्ये बॉम्बविद्या शिकून मुंबईतील माहिम येथे बॉम्ब कारखाना सुरू केला.
  • कोल्हापूरचे के. डी. कुलकर्णी जपानमध्ये बॉम्बविद्या शिकून आले. त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली.
  • पांडुरंग सदाशिव खानकोजे हेदेखील जपानमधून बॉम्बविद्या शिकून आले.

महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी थोडक्यात माहिती
महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी थोडक्यात माहिती व सराव प्रश्न

1 thought on “विषय : इतिहास [महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी थोडक्यात माहिती व सराव प्रश्न”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र