मराठी व्याकरण सराव टेस्ट संधी November 19, 2024November 11, 2024 by patilsac93@gmail.com विषय - मराठी व्याकरण सराव टेस्ट ( प्रकरण - 2 संधी )स्पर्धा परीक्षेत सध्या पैकी च्या पैकी मार्क्स मराठी व्याकरण या विषयात खुप मुलं घेत आहेत, पण काही मुलं असेही असतात कि गोंधळून जातात. आपण त्याचसाठी मराठी चा प्रत्येक प्रकरणावर 25 मार्कांची सराव टेस्ट घेऊन तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल तो प्रयत्न आम्ही करत आहोत. आपणही टेस्ट लिंक जास्तीत जास्त शेअर करावी. 1 / 25षड्रिपू षट + ड्रिपू षट् + रिपू ष् + ड्रिपू षड + रिपू 2 / 25त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती? उज्ज्वल तल्लीन सज्जन वाल्मिक 3 / 25व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. चिदानंद तपोधन कवीश्वर दुरात्मा 4 / 25नकोसे, जरासा हें जोडशब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? विसर्ग संधी विजातीय संधी पररूप संधी पूर्वरूप संधी 5 / 25कधी कधी शब्दांची संधी होत असतांना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. यालाच ---------- संधी असे म्हणतात. पररूप संधी पूर्वरूप संधी व्यंजन संधी विसर्ग संधी 6 / 25खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते? नीरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 7 / 25पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. मन्वंतर गणेश जगन्नाथ वाग्विहार 8 / 25खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? सदाचार सन्मती वाङ्मय समाचार 9 / 25'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो? भाषेंतर्गत भाष्यंतर्गत भाषांतर्गत भाषाअंतर्गत 10 / 25'अ' किंवा 'ऊ' पुढे विजातीय स्वर आल्यास 'उ' किंवा 'ऊ' बद्दल 'व' होतो. अधोवदन मन्वंतर गावकरी कवीश्वर 11 / 25आंनदोद्रेक आनंद + ऊद्रेक आनंदी - ऊद्रेक आनंद + उद्रेक आनंदी - उद्रेक 12 / 25'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाच + नालय वाचन + आलय वाचना + आलय वाचन + अलय 13 / 25संधीचे किती प्रकार पडतात? दोन तीन चार पाच 14 / 25-------- म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधी व्यंजन स्वर शब्दशक्ती 15 / 25खालीलपैकी विसर्ग संधी ओळखा. दुःख सज्जन धनादेश गिरीश 16 / 25'धनादेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी हल संधी 17 / 25खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही? स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी अनुस्वार संधी 18 / 25'पित्राज्ञा' पिता + आज्ञा पितृ + ज्ञा पित्र + आज्ञा पितृ + आज्ञा 19 / 25दुःख हे जोडाक्षर कसे बनले आहे? द् + ऊ +: + ख् + अ द् + ऊ +: + ख् + आ द् + इ +: + ख् + अ द् + उ + : + ख् + अ 20 / 25संधीचा विग्रह करा - नदीत नदी + त नद + ईत नद + इत नदी + आत 21 / 25जगज्जननी जगज + ननी जग् + अननी जगत् + जननी जग् + जननी 22 / 25'चंद्रोदय' चंद्र + ओदय चंद्र + दय चंद्र + उदय चंद्रो + उदय 23 / 25एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे --------- स्वर संधी स्वर विसर्ग संधी पररूप संधी व्यंजन संधी 24 / 25'गिरीश' या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? गिरी + इश गिरि + ईश गिरी + ईश गिरि + इश 25 / 25'पुनरावृत्ती' हा संधी कसा सोडवला जाईल. पुनः + आवृत्ती पुनर् + आवृत्ती पुनः + वृत्ती पुनर् + वृत्ती Your score isThe average score is 64% 0% Restart quiz
Very nice test
1