मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 8] केवलप्रयोगी अव्यय ) सराव प्रश्न March 6, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती - 8] केवलप्रयोगी अव्यय ) सराव प्रश्न 1 / 251) योग्य विधाने निवडा.अ) केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात.ब) केवलप्रयोगी अव्यये भावनाप्रधान असतात.क) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण नऊ प्रकार पडतात.ड) केवलप्रयोगी अव्यये वाक्याचा भाग नसतात. A) अ, ब, क B) ब, क, ड C) सर्व चूक D) सर्व बरोबर 2 / 252) बापरे! किती उंच इमारत ही ! A) प्रशंसादर्शक B) आश्चर्यदर्शक C) भीतिदर्शक D) खेददर्शक 3 / 253) खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते? A) वाग, अहा B) अरेरे, आईग C) शाबास, वाहवा D) छे, छट 4 / 254) योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा................! काय हे तुझं अक्षर ! A) शी B) शाबास C) अबब D) ठीक 5 / 255) 'छी! किती घाणेरडा आहेस तू'! या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा? A) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय B) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय C) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय D) विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय 6 / 256) 'शाब्बास' हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे? A) शब्दयोगी B) उभयान्वयी C) केवलप्रयोगी D) क्रियाविशेषण 7 / 257) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय योजिले आहे? A) बापरे! किती मोठा हा साप ! B) अरेरे! फार वाईट झाले हे! C) पण मन बेटे स्वस्थ राहीना! D) अबब! किती उंच मनोरा हा 8 / 258) 'ठीक' या शब्दाची भावना ओळखा. A) हर्षदर्शक B) संवोधनदर्शक C) संमतिदर्शक D) मौनदर्शक 9 / 259) केवलप्रयोगी अव्ययाविषयी विचार करा.अ) केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून ठरवितात.ब) केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण ती अव्यये कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवितात. A) अ बरोबर B) ब बरोबर C) अ आणि ब बरोबर D) अ आणि ब चूक 10 / 2510) उद्गारवाचक अव्यय ओळखा. A) शिवशिव B) परंतु C) शिवाय D) त्यापेक्षा 11 / 2511) उद्गारचिन्ह (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? A) भावना B) वर्णन C) कृती D) कृती 12 / 2512) पुढील वाक्यात योग्य 'केवल प्रयोगी अव्यय' लिहा. .........किती उंच मनोरा हा ! A) अबब! B) अरेरे! C) अयाई! D) इश्श! 13 / 2513) 'हाय हाय' कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे? A) खेददर्शक B) आनंददर्शक C) शोकदर्शक D) तिरस्कारदर्शक 14 / 2514) 'छे छे!' या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? A) तुच्छता B) तिरस्कार C) आश्चर्य D) विरोध 15 / 2515) 'अरेच्या' या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. A) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यव B) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय C) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय D) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय 16 / 2516) रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा. '--------------'साहेब ! मी घरी जाऊ का? A) अरेच्चा B) अहो C) वा D) अरे 17 / 2517) योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा. .............केवढी गर्दी ही! A) अरेरे! B) अहाहा! C) अरेच्या! D) अबब! 18 / 2518) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची खालीलपैकी: उदाहरणे ओळखा.अ) अबब! केवडा मोठा नाग तो.ब) वाहवा! फारच छान झाले.क) छे छे! त्यांस हे जमणारच नव्हते.ड) ठीक । हे अतिशय उत्तम झाले. A) फक्त अ,ब,क B) क, ड C) फक्त ड D) , क, ड 19 / 2519) आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते? A) उद्गारवाचक B) प्रश्नचिन्ह C) स्वल्पविराम D) पूर्णविराम 20 / 2520) पर्यायी उत्तरांतील 'व्यर्थ उद्गारवाची वाक्य' कोणते? A) चूप, तू बाहेर जा बरे. B) अरे, खरच की, तू येणार होतास तर C) माझं मन बेटे गप्प बसेना D) शिव शिव शिव, हे व्हावयास नको होते. 21 / 2521) 'छट! एक शब्द बोलू नकोस'. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. A) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय B) विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय C) मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय D) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय 22 / 2522) जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात, त्यांना ........अव्यय असे म्हणतात. A) क्रियाविशेषण B) शब्दयोगी C) केवलप्रयोगी D) उभयान्वयी 23 / 2523) केवलप्रयोगी अव्यय ओळखा अरेच्या! हा रघू माझा बालमित्र. A) अरेच्या B) हा C) रघु D) माझा 24 / 2524) पुढील शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा. 'इश्श' A) केवलप्रयोगी अव्यय B) उभयान्वयी अव्यय C) क्रियाविशेषण अव्यय D) धातुसाधित अव्यय 25 / 2525) 'अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? A) केवलप्रयोगी अव्यय B) उभयान्वयी अव्यय C) विशेषण D) क्रियापद Your score isThe average score is 65% 0% Restart quiz