मराठी व्याकरण ( वाक्यप्रचार ) सराव टेस्ट March 14, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ) सराव प्रश्न 1 / 251) 'दुःखाचे परिमार्जन करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ? A) दुःखात बुडून जाणे B) दुःख आवरता न येणे C) दुःख दूर करणे D) वचन न पाळणे 2 / 252) चतुर्भुज होणे म्हणजे. A) मतभेद होणे B) लग्न होणे C) भांडण होणे D) गर्व होणे 3 / 253) खडाष्टक' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? A) त्याग करणे B) त्याग करणे C) दोघांचे न पटणे D) दोष लावणे 4 / 254) 'खिरीत सराटा घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ? A) चांगल्या कामात अडथळे आणणे. B) एखादया गोष्टीचा अतिरेक करणे. C) एखादयाचा पिच्छा पुरविणे. D) काहीतरी भानगड असणे 5 / 255) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.हातातोंडाशी गाठ पडणे' A) हात तोंड एकत्र येणे B) यातायात करणे C) जेमतेम खाण्यास मिळणे D) प्रारंभ करणे 6 / 256) खालीलपैकी चुकीचा वाक्यप्रचार ओळखा. A) आधाधिणे- भिती वाटणे B) अंगीं आणणे - बिंबवून घेणे C) ऊहू करणे सुरु करणे D) गळ टाकणे - पैसे मिळणे 7 / 257) पाण्यात पाहणे - वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय लिहा A) त्याग करणे B) वाया जाणे C) मोहात पडणे D) द्वेष करणे 8 / 258) 'काम अडणे' याला जुळणारा वाक्प्रचार कोणता ? A) घोडे पेंड खाणे B) डाळ शिजणे C) पायमल्ली करणे D) हात मारणे 9 / 259) 'आंबून जाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. A) आनंदीत होणे B) थकून जाणे C) रममान होणे D) कुजून जाणे 10 / 2510) आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सुरजच्या डोळ्यासमोर........? A) कंठस्नान घातले B) कान भरले C) काजवे चमकले D) गगन ठेंगणे झाले 11 / 2511) 'उन्मिलित होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. A) उफाळून येणे B) विकसित होणे C) अतिशय गर्व होणे D) मिळवून देणे 12 / 2512) 'कागदी घोडे नाचविणे' या वाक्प्रचाराचा अर्थ - A) लेखनात कमीपणा वाटणे B) कागदाचे घोडे करुन नाचविणे C) पुढे-पुढे करणे D) अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालविणे 13 / 2513) 'अलम दुनियेत फिरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? A) सारे जग फिरणे B) न फिरताच जग फिरल्याचा आव आणणे C) कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे D) स्वप्न पाहणे 14 / 2514) हात तोकडे पडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. A) केवळ कागदी पराक्रम करणे B) मदत करण्यास क्षमता कमी पडणे C) पराभव करणे D) अशक्य गोष्ट करू पाहणे 15 / 2515) 'मन कातर होणे' म्हणजे.. A) भयभीत होणे B) दुःख होणे C) गप्प बसून राहणे D) उपकारातून मुक्त होणे 16 / 2516) 'कच्छपी लागणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा A) व्यर्थ समजूत काढणे B) एखाद्याच्या नादी लागणे C) तहान लागणे D) यापैकी नाही 17 / 2517) 'आहारी जाणे'या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. A) पूर्ण ताब्यात जाणे B) न्याहारी करणे C) गावाला जाणे D) मरण पावणे 18 / 2518) 'अर्ध्या वचनात राहणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ? A) आज्ञा पाळणे B) अपूर्ण वाचन करणे C) अर्धवट ज्ञान D) वचन न पाळणे 19 / 2519) वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा? पित्त खवळणे A) भांडण करणे B) खूप राग येणे C) बरे न वाटणे D) नाराज होणे 20 / 2520) 'शेणाचा दिवा लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. A) मुर्खपणाचे कृत्य करणे B) दिवाळे काढणे. C) भित्रेपणा दाखवणे D) मिजास करणे 21 / 2521) 'रक्ताचे पाणी करणे' A) रक्त पातळ होणे B) रक्तदान करणे C) जास्त मेहनत करणे D) आजारी पडणे 22 / 2522) 'कान लांब होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. A) अक्कल कमी होणे B) अक्कल जास्त होणे C) बहिरा हो D) वारंवार ऐकुन कंटाळणे 23 / 2523) 'तांडव नृत्य करणे' ला....... हा वाक्प्रचार समानार्थी आहे A) पित्त खवळणे B) शंख करणे C) तलवार गाजविणे D) थयथयाट करणे 24 / 2524) राशीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा. A) इच्छा पुरविणे B) छळणे C) योग्य ठिकाणी बसणे D) शांत चित्ताने बसणे 25 / 2525) खालीलपैकी कोणता वाक्प्रचार बरोबर नाही. A) फाटा देणे- नाहीसा करणे B) प्राक्तनाचा खेळ नशिबाचा खेळ C) मागोवा घेणे पसंत पडणे D) मिरास असणे मक्तेदारी असणे Your score isThe average score is 54% 0% Restart quiz