भारतातील संकीर्ण घडामोडी यावर सराव प्रश्न

भारत : गौरवचिन्हे

भारताचे राष्ट्रगीत : जन गण मन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • रचना : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
  • (मूळ गीत ५ कडव्यांचे, मात्र पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता)
  • हे गीत गुरुदेवांनी पहिल्यांदा बंगाली भाषेत लिहिले. १९११ मध्ये अबिद अली यांनी त्याचे हिंदी भाषांतर केले.
  • प्रथम गायन : २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन, अध्यक्ष विशन नारायण दास)
  • राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता २४ जानेवारी १९५०: (गायनाचा कालावधी: ५२ सेकंद)
  • राष्ट्रगीताचा इंग्रजी अनुवाद: ‘Morning Song of India’ (रवींद्रनाथ टागोर)

राष्ट्रीय गीत :

  • वंदे मातरम् (निवड: बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून)
  • प्रथम गायन : १८९६ चे कोलकाता अधिवेशन. (अध्यक्ष रहिमतुल्ला सयानी)

राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) :

  • राष्ट्रचिन्हाची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील स्तंभावरून.
  • राष्ट्रचिन्हास मान्यता २६ जानेवारी १९५०

राष्ट्रचिन्हाचे स्वरूप :

  • सिंह, घोडा, बैल व हत्ती या प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे.
  • चार सिंहांपैकी तीन दर्शनी बाजूस व एक पाठीमागे.
  • राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल असे ‘धर्मचक्र’ आहे.
  • राष्ट्रचिन्हाखाली ‘सत्यमेव जयते’ हा देवनागरी लिपीतील संदेश असून त्याची निवड ‘मुंडक उपनिषदातून’ केली आहे.
  • ‘सत्त्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य बनविण्याची जबाबदारी पं. मदनमोहन मालवीय यांच्याकडे होती.

भारताचा राष्ट्रध्वज :

  • २२ जुलै १९४७ रोजी संविधान समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली.
  • स्वरूप : तिरंगा
  • सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा.
  • केशरी (भगवा) : शौर्य व त्यागाचे प्रतिक.
  • पांढरा : शांतता व पावित्र्य.
  • हिरवा : समृद्धीचे प्रतिक.
  • मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर निळसर (Navy Blue) रंगाचे अशोक चक्र. हे चक्र गौतम बुद्धांच्या उपदेशानुसार ‘अष्टांग मार्गाचे’ प्रतिनिधित्व करते तसेच न थांबणाऱ्या गती व प्रगतीचे द्योतक आहे.
  • हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत.
  • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर ‘२ : ३’ इतके असते.
  • राष्ट्रध्वजाची संकल्पना व रचना मछलीपट्टण (आंध्र प्रदेश) येथील पिंगाली वेंकय्या या शेतकऱ्याने मांडली.
  • कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीवस्त्रापासून व विशिष्ट ९ आकारांतच तयार करणे बंधनकारक आहे.

राष्ट्रध्वजाचा आकार : अतिमहनीय व्यक्तींच्या विमानावर ४५०० x ३०० मिमी; राजकीय महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोटारीवर २२५ x १५० मिमी. आकाराचा ध्वज (तिरंगा) लावतात.


राष्ट्रीय कॅलेंडर :

  • मान्यता २२ मार्च १९५७ शके कालगणनेनुसार रचना (इसवीसनाच्या मागे ७८ वर्षे)
  • राष्ट्रीय कॅलेंडरनुसार (शके कालगणना) नववर्षाची सुरूवात चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढी पाडवा)
  • ग्रेगेरियन कॅलेंडरशी सांगड घालताना, चैत्र शुध्द प्रतिपदा दरवर्षी २२ मार्च रोजी व लीप वर्षात २१ मार्च रोजी येते.
  • या कॅलेंडरनुसार वर्षाचे ३६५ दिवस मानतात. १९४७ मध्ये भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली.

राष्ट्रीय प्रार्थना (National Pledge):

  • भारत माझा देश आहे… (India is My Country…)
  • ही प्रार्थना सर्वप्रथम १९६२ साली पी. वेंकट सुब्बा राव यांनी तेलगू भाषेत लिहिली.
  • १९६३ साली विशाखापट्टणम् येथील शाळेत या प्रार्थनेचे प्रथम वाचन झाले.

भारत : विविध राज्ये व त्यांचे नृत्य प्रकार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
राज्यप्रसिध्द नृत्यप्रकारप्रसिध्द कलाकार
उत्तर प्रदेशकथ्थकशंभू महाराज, बिरजू महाराज, गोपीकृष्ण, सितारादेवी, रोहिणी भाटे, शर्मिष्ठा मुखर्जी
तामिळनाडूभरतनाट्यमइंद्राणी रेहमान, रूक्मिणीदेवी अरूंडेल, मृणालिनी साराभाई, पद्मा सुब्रमण्यम
आंध्रप्रदेशकुचीपुडीराधा रेड्डी, चीना सत्यम
केरळकथकलीकुंज कुरूप
ओरिसाओडिसीगुरू केलुचरण, संजुक्ता पाणीग्रही, सोनल मानसिंग, माधवी मुदगल
मणिपूरमणिपुरीजव्हेरी भगिनी, रिटा देवी, उदयशंकर
केरळ : मोहिनी अट्टम, चक्कियार कुथ्थु, ओटम् थूल्लल, करिकोट्टीकल्ली (थिरुवाथिरुकली)
भरत नाट्यम : नृत्याची अन्य नावे : सादिर नृत्य, दासी अहम, तंजावूर नाट्यम

राज्य /कें.प्र.लोकनृत्य राज्य /कें.प्र.लोकनृत्य राज्य /कें.प्र.लोकनृत्य
उत्तर प्रदेश नौटंकी,कजरी उत्तराखंड नौटंकी ,कजरी लक्षद्विप परिचाकल्ली
कर्नाटक यक्षगाण मध्यप्रदेश लोटा , पांडवानी राजस्थान झुमर, चामर-गिंदाद
बिहार बिडेसी पंजाब भांगडा,गिध्दा आसाम बिहू,सत्रिया
जम्मू – काश्मीर चक्री मेघालय वांगला लाहो गुजरात गरबा, भावी
हिमाचल प्रदेश कायंगा – बाकायंगा मिझोरम चिराव आंध्रप्रदेश कोट्टम
हरियाणा गिड्डा तामिळनाडू थिलाना छत्तीसगड लोटा ,पांडवानी
मणिपूर – पुंग चोलम

राज्यसणराज्यसणराज्यसण
केरळ ओणम ,विसू आसाम बिहू,दुर्गापूजा पंजाब,
हरियाणा
लोहारी,वसंत , बैसाखी,तीज
तामिळनाडू पोंगल कर्नाटक दसरा गुजरात नवरात्री
पं. बंगाल दुर्गापूजा गोवा कार्निव्हल झारखंड सरहूल
संस्थामुख्यालयसंस्थामुख्यालय
साहित्य अकादमीदिल्लीसालारंजग म्युझियमहैद्राबाद
संगीत नाटक अकादमीदिल्लीएशियाटिक लायब्ररीमुंबई
ललितकला अकादमीदिल्लीव्हिक्टोरिया मेमोरियल हॉलकोलकाता
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टदिल्लीराजा केळकर वस्तु संग्रहालयपुणे
विज्ञानभवनदिल्लीभारत भवनभोपाळ
इंडियन म्युझियमकोलकाताजहांगिर आर्ट गॅलरीमुंबई
वाद्यप्रसिद्ध वादक
संतूर पं. शिवकुमार शर्मा, पं. सतीश व्यास
सरोद उस्ताद अमजदअली खाँ, अली अकबर खाँ, श्रीमती झरीन दारुवाला, अल्लाउद्दीन खाँ
सतार पं. रवीशंकर, विलायतखान, अब्दुल हलीम जाफरखाँ, बुधादित्य मुखर्जी, नीलाद्रीकुमार (सतार, झिटार), उस्ताद सुजात खान
तबला उस्ताद झाकीर हुसेन, पं. सामंता प्रसाद, अहमदखान थिरकवाँ, पं. सुरेश तळवलकर, पं. विजय घाटे, श्रीमती अबन मिस्त्री
व्हायोलीन कै. व्ही. जी. जोग, गजानन जोशी, अरविंद मफतलाल, एल. शंकर, तेजसकुमार उपाध्ये, डी. के. दातार.
बासरी पं. हरिप्रसाद चौरासिया, पन्नालाल घोष, सिक्किल भगिनी
रुद्रवीणा बहाउद्दीन डागर, दत्तात्रय पर्वतीकर, असद अली खान
शहनाई बिस्मिल्लाखान
वीणा सादिक अली खाँ
सुरबहार (बास-सितार) : अन्नपूर्णा देवी
श्रुती वीणा लालमणी मिश्रा
मोहनवीणा पं. विश्वमोहन भट्ट
सप्त खंजिरी सत्यपाल महाराज, उदयपाल वणीकर

भारतातील संकीर्ण घडामोडी यावर सराव प्रश्न

2 thoughts on “भारतातील संकीर्ण घडामोडी यावर सराव प्रश्न”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र