भारतातील वनविषयक संकीर्ण माहिती

  • राजस्थानच्या वाळवंटात सुईसारख्या लांब फांद्यांचे व पर्णविरहीत ‘खिप झुडुप’ या प्रमुख वृक्षाबरोबर खैर, फोग, निवडुंग, खेजरी, बेरी हे वृक्ष आढळतात.
  • इस्त्रायली बाभूळ हा वृक्ष वाळवंटात वनीकरणासाठी वापरला जातो.
  • राजस्थान वाळवंटात ‘जोजोबा’ या वृक्षाची आर्थिकदृष्ट्या लागवड केली जात असून तेथे जोजोबाच्या बियांपासून तेल काढले जाते.
  • भूटाननजिक पूर्व हिमालयीन टेकड्या व पूरमैदाने यांमधील प्रवेशद्वार म्हणजे ‘दुआर’ (दार). दुआर प्रदेशात साल व शिसव हे प्रमुख वृक्ष आढळतात.
  • गंगेच्या मैदानातील भांबर व तराई प्रदेशात साल व सेमल हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • केनब्रेकस : गंगा त्रिभूज प्रदेशातील दाट उंच गवताळी भाग.
  • गंगेच्या मुखाकडील मैदानात पश्चिम बंगालच्या त्रिभूज प्रदेशात सुंद्री वृक्ष आढळतात.
  • विषुववृत्तीय प्रकारच्या वनांत ‘चंदन’ हा उच्च व्यापारी मूल्य असलेला वृक्ष आढळतो.
  • दक्षिण सह्याद्रीतील उष्ण कटिबंधीय वने ‘शोला वने’ म्हणून प्रसिद्ध असून येथे निलगिरी व साग यांची लागवड केली आहे.
  • किनारी भागात सामाजिक वनीकरणांतर्गत काजू, फणस यांची लागवड केली जाते.
  • द्वीपकल्पीय पठारी भागात ‘सॅव्हाना’ (सुदान) प्रकाराशी साम्य असणारे गवताळ प्रदेश आढळतात.
  • आसाममधील उंचचउंच गवताळ प्रदेश ‘दोआर्स’ या नावाने, तर उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी असणारे गवताळ प्रदेश ‘तराईचे प्रदेश’ या नावे ओळखले जातात.
  • हिमालयातील उष्ण कटिबंधीय पानझडी वनांमध्ये ‘साल’ हा मौल्यवान वृक्ष आढळतो.
  • समशीतोष्ण कटिबंधीय वनात ‘चिनार’ हा सूचीपर्णी वृक्ष आढळतो. चिनार हा जम्मू-काश्मिरचा राज्य वृक्ष आहे.
  • भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी ५२ टक्के वनक्षेत्र हिमालयात आहे.अंदमान बेटांवरील ‘महोगनी’ वृक्षाचे लाकूड फर्निचर बनविण्यासाठी वापरले जाते.
  • अंदमानच्या जंगलात धूप व रुद्राक्षाची झाडे आढळतात.
  • तामिळनाडूमध्ये ‘पिचावरम’ ही मँयुव्ह वने आढळतात.
  • पंजाब-हरियाणाच्या मैदानी प्रदेशात ‘अलबुखार’ वृक्ष आढळतो.
  • वृक्षशेतीसाठी उपयुक्त वृक्ष साग, खैर, चंदन, मॅजियम.शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी ‘शिसव’, तर पंजाबमधील पतियाळा येथे ‘डाक’ वृक्ष आढळतो.
  • बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यातून लाखेचे उत्पादन होते.
  • लाखेचा उपयोग औषधे, रंग, ग्रामोफोन रेकॉर्ड, बांगड्यानिर्मिती अशा अनेक उद्योगांत केला जातो.
  • बाभळीची साल कातडी कमविण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • १८६४ : भारतात इंपिरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना होऊन डॉ. डिट्रिक ब्रांडिश हे जर्मन वन अधिकारी भारतातील पहिले वन महानिरीक्षक (इन्सपेक्टर जनरल) बनले.
  • १८६७ इंपिरियल फॉरेस्ट सर्व्हिसची स्थापना.
  • १९०५ : पर्यंत लंडनमधील कूपर्स हिल्स ही भारतीय वनाधिकाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट वन प्रशिक्षण संस्था मानली जात होती.
  • १९०६ : डेहराडून येथे इंपिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना.
  • १९२७ पासून या संस्थेत भारतीय वन अधिकाऱ्यांना (IFS) प्रशिक्षण दिले जाते.
  • १९२७ : भारतीय वन अधिनियम संमत.
  • १९७२ : केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम.
  • १९८० साली स्थापन झालेल्या स्वायत्त वन विभागास १९८५ मध्ये स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाचा दर्जा
  • १९८० : वन संवर्धन अधिनियम
  • १९८६ : पर्यावरण संरक्षण अधिनियम
  • १९ ऑक्टोबर १८९४ : पहिले राष्ट्रीय वन धोरण
  • १९५२ दुसरे राष्ट्रीय वन धोरण
  • १९८८ तिसरे राष्ट्रीय वन धोरण
  • राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार १९७७ मध्ये ‘जंगल’ (वने) हा विषय राज्य व केंद्र सरकार यांच्यासमवर्ती सुचीमध्ये समाविष्ट.
  • अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूट वल्लभगढ़ (हरियाणा)
  • प्रोजेक्ट टायगर : १ एप्रिल १९७३ (उद्देश बंगाली वाघांची संख्या वाढविणे)
  • २००३ : राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना (अहवाल : २००६)
  • भारतात १९५२ पासून ‘वन महोत्सवास’ सुरुवात झाली.
  • वनमहोत्सव सुरू करण्याचे श्रेय जाते भारताचे पहिले वनमंत्री कन्हैयालाल मुन्शी यांना.
  • दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात ‘वन महोत्सव’ साजरा होतो.
राष्ट्रीय उद्यानस्थान ( जिल्हा )राज्य
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानबोरिवली (मुंबई)महाराष्ट्र
ताडोबा राष्ट्रीय उद्यान ( वाघ व मगरीसाठी )चंद्रपूरमहाराष्ट्र
प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यानसिवनीमध्यप्रदेश
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानगोंदियामहाराष्ट्र
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी)नैनिताल (रामनगर)उत्तराखंड
बंदीपूर राष्ट्रीय उद्यानम्हैसूरकर्नाटक
शिवपुरी राष्ट्रीय उद्यानशिवपुरीमध्यप्रदेश
कान्हा राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी)मांडलामध्यप्रदेश
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (एकशिंगी गेंडा)जोरहाटआसाम
भरतपूर राष्ट्रीय उद्यान (पक्ष्यांसाठी)भरतपूरराजस्थान
बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान (हत्ती)बंगळूरूकर्नाटक
वाल्वादार राष्ट्रीय उद्यान (लांडगे)भावनगरगुजरात
गिंडी राष्ट्रीय उद्यानचेन्नईतामिळनाडू
नागरहोल राष्ट्रीय उद्यानकुर्गकर्नाटक
बेटला राष्ट्रीय उद्यान (वाघ)पलामूझारखंड
कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान (सिंह)शिवपूर – मोरेनामध्य प्रदेश

१) देहिंग पत्काई, आसाम (मे २०२०),

२) रायमोना नॅशनल पार्क, आसाम (जून २०२१)

  • टीप : १९८१ साली स्थापन झालेल्या कुनो अभयारण्यास डिसेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा.
  • गुजरातमधील गीर अभयारण्यानंतर कुनो-पालपूर हे आशियाई सिंहांचे भारतातील दुसरे घर बनले आहे. Project Cheetah : १७ सप्टेंबर २०२२ रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिवियाहून आणलेले चित्ते सोडण्यात आले.
  • भारतातून १९५२ साली नामशेष झालेला चित्ता ७० वर्षांनी पुन्हा भारतात आला ।
  • डिसेंबर २०२२ अखेर भारतातील वन्यजीव अभयारण्यांची संख्या : ५६५
  • क्षेत्र : १,२२,५६२ चौकिमी (३.७३%)
  • व्याघ्र प्रकल्पांची संख्या : ५५
  • अंदमान-निकोबार केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक ९४ अभयारण्ये आहेत.

१) महाराष्ट्र (५०), २) कर्नाटक (३५), ३) तामिळनाडू (३१), ४) हिमाचल प्रदेश (२८)

अभयारण्यप्राणी/पक्षीस्थान (राज्य)
कर्नाळा अभयारण्यपक्षीरायगड (महाराष्ट्र)
माळढोक अभयारण्यपक्षीनगर-सोलापूर (महाराष्ट्र)
इंद्रावती अभयारण्यवाघछत्तीसगढ
सुलतानपूर लेक (तलाव) अभयारण्यपक्षीगुरगाव (हरियाणा)
सिमलीपाल अभयारण्यवाघमयूरभंज (ओडिशा)
दाचिंगम अभयारण्यहंगूल-हरीणश्रीनगर (जम्मू-काश्मीर)
रणथंबोर अभयारण्यवाघसवाई माधवपूर (राजस्थान)
घटप्रभा अभयारण्यपक्षीघटप्रभा (कर्नाटक)
मानस अभयारण्यवाघबारपेटा (आसाम)
सुदरबन अभयारण्यवाघचौवीस परगणा (प. बंगाल)
रंगनथिट्ट अभयारण्यपक्षीम्हैसूर (कर्नाटक)
दालमा अभयारण्यवाघसिंगभूम (झारखंड)
इटांगकी अभयारण्यहत्तीकोहिमा (नागालँड)
दांडेली अभयारण्यवाघदांडेली (कर्नाटक)
परंबीकुलम अभयारण्य (३८ वा व्याघ्रप्रकल्प)वाघपालघाट (केरळ)
कावल अभयारण्य (४२ वा व्याघ्रप्रकल्प)वाघआदिलाबाद (तेलंगणा)
  • पंजाबमधील तरण तारण साहीब जिल्ह्यात हरी-के-पत्तन’ राष्ट्रीय पाणथळीचा प्रदेश येथे अभयारण्य विकसित झाले आहे.
  • भारतात राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांखालील क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ५.०५% इतके आहे.
  • भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड (१९३६).
  • मणिपूरमधील लोकटाक सरोबरात ”किबुल लामजाओ” हे जगातील सर्वात मोठे तरंगते अभयारण्य असून येथे ‘सांगाई’ हे दुर्मिळ हरीण आढळते.
  • लोकटाक सरोवर हे ईशान्य भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे तरंगते सरोवर आहे.
  • आसाममधील कर्बी आंगलांग जिल्ह्यात ‘गरमपाणी वन्यजीव अभयारण्य’ आहे पश्चिम घाटात एकूण १३ राष्ट्रीय उद्याने व २० वन्यजीव अभयारण्ये आहेत.
  • कच्छच्या आखातात सागरी राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात आले आहे.

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र