नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर माहिती व सराव टेस्ट

  • जन्म : 23 जानेवारी 1897 ला ओडिसा मध्ये कटक येथे झाला.
  • यांना नेताजी, बाबु इत्यादी नावांनी आदराने संबोधले जाते.
  • आईचे नाव – प्रभावतीदेवी, वडिलांचे नाव – जानकीनाथ
  • 1919 मध्ये B.A. झाले व 1920 मध्ये ICS झाले.
  • 1921 मध्ये ICS वर पाणी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
  • 1924 मध्ये कलकत्ता मनपाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले.
  • 1927 मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव होते.
  • 1929 च्या लाहोर काँग्रेस अधिवेशनात वसाहतीच्या स्वराज्याऐवजी काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. यासाठी नेताजी सुभाष बाबु यांनी जोरदार प्रयत्न केले.
  • 1938 च्या हरीपूरा काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
  • 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • 1939 च्या त्रिपुरी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली परंतु काँग्रेस कार्यकारीणीकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला.
  • 1941 ला 15 जानेवारी रोजी नेताजी ब्रिटीशांच्या नजरकैदतून निसटून जर्मनीला पोहोचले.
  • भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत जर्मनीच्या हिटलरशी चर्चा करुन जर्मनीमध्ये आझाद हिंद रेडिओ केंद्राची सुरुवात केली.
  • जपानमध्ये रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्य संघ व आझाद हिंद सेना स्थापन केली होती.
  • सुभाषबाबूंनी जपानला जाऊन रासबिहारी बोस यांच्या आग्रहानुसार आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्विकारले.
  • सुभाष बाबुंनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे प्रयत्न केले त्याला इतिहासात जोड नाही.
  • आधुनिक भारताच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे सुभाषबाबु व आझाद हिंद सेना होय.
  • नेताजी सुभाष बाबुंचे आझाद हिंद सेना सहकारी शहानवाझ खान, डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन (झाशी राणी ब्रीगेड प्रमुख), जगन्नाथ राव भोसले, प्रेमकुमार सहगल इत्यादी.
  • 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार जिंकून त्यांना अनुक्रमे शहीद व स्वराज्य बेट अशी नावे दिली. पुढे माऊडॉक, कोहिमा जिंकले व इंफाळ जिंकण्याचा प्रयत्नात असताना दुसऱ्या महायुध्दाचे पारडे फिरले. अमेरिका, इंग्लंड यांची बाजू मजबूत झाली.
  • 1943 मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली.
  • त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 मध्ये विमान अपघातात झाला असे म्हटले जाते.
  • 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता पण त्यांच्या कुटुंबीयांनी तो स्वीकारला नाही.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर माहिती व सराव टेस्ट

1 thought on “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर माहिती व सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र